बीडमध्ये कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू
बीड प्रतिनिधी:- मराठवाडयातील मराठा समाजास मराठा - कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयकडून सुरू करण्यात आली आहे
न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली मराठवाडयातील मराठा समाजास मराठा - कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली.
त्यानुसार जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेजच्या आधारावर कुणबी मराठा प्रमाणपत्र वितरीत करण्यात येत आहेत .
आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी डॉक्टर त्रिगुण कुलकर्णी आणि उपजिल्हाधिकारी कविता जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिनिधी स्वरूपात शुक्रवारी काही लोकांना जात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेली आहेत. येत्या काळात बीड जिल्ह्यात, शिरूर, गेवराई तालुक्यात विशेष शिबिर लावून जात प्रमाणपत्र उपलब्ध करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
What's Your Reaction?