गळफास घेऊन मजुराची आत्महत्या

बीड: आजारपणाला कंटाळून आष्टी तालुक्यातील कडा शहरातील सुंदर नगर येथे एकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे .सदर घटना आज गुरुवारी सकाळच्या दरम्यान घडली आहे. सदर घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
अशोक सुभाष वाडेकर (४३) असे मृताचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील कडा येथील सुंदरनगर येथे राहत असलेले अशोक सुभाष वाडेकर हे मजूरी करत. हातावर पोट असलेल्या अशोक यांना अचानक कॅन्सरचे निदान झाले. मागील काही महिन्यांपासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजारांशी झुंज देत होते. घरी आधीच अठरा विश्व दारिद्रय असल्याने त्यांना कॅन्सरवरील महागडे उपचार कसे होणार याची चिंता सतावत होती. मात्र, ही बाब समजताच मित्रांनी लोक वर्गणी करून त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार केले. येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यानंतरही त्यांना अधिक उपचाराची गरज होती, यासाठी पैसे उभे करण्याचे मोठे आव्हान मजूरी करणाऱ्या अशोक वाडेकर यांच्यासमोर होते. त्यामुळे नैराश्यात येऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. व आपली जीवन यात्रा संपवली.
What's Your Reaction?






