राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑगस्ट
बीड (प्रतिनिधी) : भारत सरकारचे महिला व बालविकास मंत्रालय प्रत्येक वर्षी शिक्षण, कला ,सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध ,सामाजिक कार्य ,व शौर्य अशा क्षेत्रामध्ये ज्यांचे वय पाच वर्षा पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या मुलांनी राष्ट्रीय स्तरावर असामान्य ओळख निर्माण करणाऱ्या असामान्य क्षमता असलेल्या मुलांना उचित ओळख प्रदान करण्यासाठी प्रतिष्ठित प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार( पी एम आर बी पी )दरवर्षी दिला जातो राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार साठीची निवड केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय अंतर्गत असलेल्या महिला व बालकल्याण समितीमार्फत करण्यात येते. गेल्या वर्षी 23 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात देशातील अकरा बालकांना प्रधानमंत्री बाल पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विशेष कार्यक्रमात अकरा बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्काराने सन्मानित केले होते . पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख ,एक मेडल व प्रमाणपत्र असे आहे. 2023 राष्ट्रीय बाल पुरस्कार साठी सहा मुले व पाच मुलीचा समावेश होता. आपल्या बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी तालुका बीड येथील गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी रोहन बहिर याने पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एका महिलेचा प्राण वाचवल्याबद्दल बालशक्ती पुरस्कारा अंतर्गत बाल शौर्य पुरस्कार ने त्याचाही सन्मान राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या हस्ते झाला होता.बीड जिल्ह्याच्या इतिहासात हा पहिलाच पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यासाठी गजानन महाविद्यालयाचे मुख्याध्यापक केशव भांगे यांनी विशेष प्रयत्न केले होते.या अगोदर महिला व बालविकास कार्यालय बीड मार्फत गेल्या दहा वर्षात बालशक्ती पुरस्कार साठी जवळपास 20 प्रस्ताव पाठविण्यात आले होते परंतु अद्याप पर्यंत एकाही बालकाला पुरस्कार प्राप्त झाला नव्हता. इतर दुसरा बालकल्याण पुरस्कार या अंतर्गत( १) वैयक्तिक पुरस्कार -मुलांच्या विकास संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान सात वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस पुरस्कार दिला जातो( 2) संस्था स्तरावर - बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो.संस्था पूर्णतः शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी, बालकल्याण क्षेत्रात किमान दहा वर्ष सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार 2024 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत . सदरचे अर्ज www.awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाइन पद्धतीने 31 ऑगस्ट 2023 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.सदर पुरस्काराची माहिती महिला व बालविकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे .अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे.यासाठी पात्र बालक, संस्था आणि व्यक्ती यांनी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुधीर ढाकणे यांनी केले आहे.तरी इच्छुक बालकांनी व व्यक्तीने आपले अर्ज 31 ऑगस्ट च्या अगोदर ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यात यावे असे अहवान राष्ट्रीय बालशक्ती पुरस्काराचे निशुल्क मार्गदर्शक तथा करिअर कौन्सिलर डॉ. संजय तांदळे बीड यांनी केले आहे.
What's Your Reaction?