आष्टी तालुक्यात आढळला बिबट्या, वन विभागाच्या तावडीतून बिबट्या फरार
आष्टी तालुक्यातील एका गावामध्ये चक्क बिबट्याचे नागरिकांना दर्शन झाले. मात्र याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर त्याला विहिरीतून पकडताना वन विभागाच्या तावडीतून बिबट्या आज शुक्रवारी फरार झाला.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पांगरा परीसरात एका विहिरीत बिबट्या आढळून आला होता. याच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन परिक्षेञ अधिकारी शाम शिरसाठ यांच्या नेतृत्वात एक पथक सर्व तयारीने गेले होते. माञ या पथकाला बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश आले असुन, बिबट्या स्वतःहून विहिरीच्या बाहेर पडला आणि धुम ठोकली. यामुळे पांगरा परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. आता पुन्हा एकदा आष्टी तालुक्यातील पांगरा येथे एका बिबट्याने धुमाकुळ घातला आहे. आष्टी तालुक्यातील पांगरा, चांदणी शिवार, दराडे वस्ती या परिसरात बिबट्याने शेतकऱ्यांच्या तीन शेळ्यांचा फडशा फाडला. त्यानंतर रामनाथ मिसाळ या शेतकऱ्यांच्या विहिरीत काल रात्रभर तो अडकला होता. आज शुक्रवार दि. ३० जुन रोजी वनविभागाचे कर्मचारी या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आले मात्र हा बिबट्या या कर्मचाऱ्यांच्या तावडीतून निसटल्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी वन विभागाला हुलकाणी देऊन हा बिबट्या फरार झाला असून त्याला तात्काळ जेर बंद करा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
What's Your Reaction?