लोकसेना राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार! प्रा.इनामदार
बीड प्रतिनिधि: लोकसेना हा आंदोलनकारी संघटन असून लोकसेना प्रमुख ॲड. प्रा.इलियास इनामदार यांच्या संघर्षवादी नेतृत्वामध्ये सतत समाजाच्या विविध प्रश्नावर लढा देत आहे सरकार व प्रशासनाकडून समाजाला न्याय अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत आंदोलने लोकसेना करत आहे हल्ली दिल्लीला समाजाच्या विविध प्रश्नासाठी लोकसेना संघटनेच्या वतीने खुप मोठे जनआंदोलन यशस्वी करण्यात आले व केंद्र सरकारचे लक्ष या आंदोलनाकड़े केंद्रित करण्यात आले आहे पुढील काळात महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत महाविकास आघाडी किंवा महायुती यांनी राज्यातील 288 पैकी 50 जागा मुस्लिम समाजाला द्यावे व आपल्या जाहिरनाम्यामध्ये मुस्लिम आरक्षण संरक्षण द्यावे व शहरांची बदललेली नावे आम्ही रद्द करुन औरंगाबाद उस्मानाबाद अहमदनगर कायम ठेवू व भविष्यात मुस्लिम द्ववेषापोटी कोणत्याही शहराचे रस्त्याचे किंवा वास्तुचे नामांतर बापाची जागीर समजून करणार नाही असे लेखी स्वरूपात जाहिरनामाद्वारे जाहिर करावे परन्तु या मागणीकड़े दुर्लक्ष केल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणूक लोकसेना संघटना सोशल इंजिनियरिंग करुन म्हणजेच मुस्लिम, ओबीसी, एसबीसी एनटी विजे अनुसूचित जाती जमाती, खुला, युवा, अल्पसंख्याक व महिला वर्गाला निवडणूक टिकेट देवून सर्व समाजाला घटकाला समतेच्या आधारावर न्याय व संधी देणार लोकसेना राज्यात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार व लवकरच उमेदवारांच्या मुलाक़ती पक्ष कार्यालयात घेण्यात येईल व पत्रकार परिषद घेवून लोकसेना संघटनेचा जाहिरनामा जनतेसमोर मांडण्यात येणार अशी माहिती लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
What's Your Reaction?