लव्ह जिहाद कायदा केंद्राच्या अजेंड्यावर नाही! पंकजा मुंडेंचा भाजप नेत्यांना घराचा आहेर

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील भाजप नेते लव्ह जिहादच्या मुद्यावरून प्रचंड आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. एवढंच काय तर लव्ह जिहादच्या विरोधात कायदा आणण्याची मागणी भाजप नेते नितेश राणे यांनी केली होती. मात्र लव्ह जिहादवरून आक्रमक होणाऱ्या याच भाजप नेत्यांना आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी घराचा आहेर दिला आहे. लव्ह जिहाद कायदा केंद्राच्या अजेंड्यावर नसल्याचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. तर प्रेम ही महत्वाच्या बाब असून त्या आड कोणतीही भिंत नको, असेही त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आयोजित लाडली बहन कार्यक्रमाच्या निमित्ताने पंकजा मुंडे जबलपूरच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत प्रेम प्रकरणाच्या आडून धर्मांतर या विषयावर त्यांना प्रश्न विचारण्यात आल्या. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, दोन व्यक्ती प्रेम बंधनात बांधल्या जात असतील त्याला विरोध करण्याचे कोणतेही कारण नाही. उलट अशा व्यक्तींचा आदरच केला पाहिजे. पण एखाद्या महिलेला आंतरजातीय विवाहाच्या नावाखाली फसवले जात असेल. तिचे शोषण होत असेल तर त्या प्रकरणाला वेगळ्या प्रकारे हाताळावे लागेल. तसेच लव्ह जिहाद कायदा केंद्राच्या अजेंड्यावर नसल्याचं वक्तव्य देखील पंकजा मुंडे यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भाजप नेते लव्ह जिहादच्या मुद्यावरून वेळोवेळी आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. तर हिंदुत्ववादी संघटनांकडून लव्ह जिहादच्या विरोधात काढण्यात आलेल्या अनेक मोर्च्यांमध्ये भाजपचे नेते सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. तर नितेश राणे याच मुद्यावरून सतत आपली भूमिका मांडत आहे. तसेच लव्ह जिहादच्या विरोधात कायद तयार करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. मात्र लव्ह जिहाद कायदा केंद्राच्या अजेंड्यावर नसल्याच्या दावा पंकजा मुंडे यांनी केल्याने भाजप नेत्यांना घराचा आहेर मिळाला आहे.
What's Your Reaction?






