माॅंसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटने ठेविदारांची फसवणूक केली, सर्व संचालकावर गुन्हा दाखल

माॅंसाहेब जिजाऊ मल्टीस्टेट या बँकेने ठेवीदारांना वेगवेगळ्या प्रकारचे अमिश दाखवून, त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी, बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेटच्या सर्व संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माॅंसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटने ठेवीदारांकडून कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत जमा करुन घेतल्या होत्या. बबन शिंदे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ठिकठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर इतर ठिकाणी काही पैसा यातला खर्च केलाय. यासह विविध ठिकाणी हा वापरण्यात आला आहे. ज्यावेळेस ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींच्या मुदती संपली त्यावेळेस ठेवीदारांना त्यांच्या रक्कमा देण्यास पैसेच नव्हते. वेळोवेळी मागणी करून देखील टाळाटाळ केले जात होते याप्रकरणी अॅंड संतोष जगताप यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये माॅंसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटच्या अध्यक्षा अनिता बबन शिंदे, बबन शिंदे, मनीष शिंदे, योगेश करंडे, अश्विनी सुनील वांढरे व बँकेचे सर्व कार्यकारी संचालक मंडळावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सर्वसामान्यांनी घामाचा पैसा या बँकेत गुंतवला होता, मात्र सर्व ठेवीदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस हे करत आहेत.
What's Your Reaction?






