मनोज जाधव प्रयत्नाने पथदिवे पुन्हा सुरू

मनोज जाधव प्रयत्नाने पथदिवे पुन्हा सुरू
प्रतिकात्मक

भुसावळ /अरुण धनगर

भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील मनोज भाऊ जाधव, फुलगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शाखा प्रमुख व विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल ता. अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली फुलगाव गावाजवळील हायवे लगतच्या रोडवरील लाईट बंद होते. पण नॅशनल हवे येथे पाठपुरावा केल्यामुळे सदर फुलगाव गावकऱ्यांना रात्रीच्या वेळेस खूप त्रास सहीन करावा लागत होता. सदर दखल घेऊन फुलगाव नागरिकांसाठी लाईट त्वरित सुरू करा अन्यथा फुलगाव नॅशनल हवे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला होता. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.अखेर त्याच्या प्रयत्न केल्यामुळे त्यांना यश मिळाले. सदर लाईट नॅशनल हवे वाले यांनी महावितरण औष्णिक विद्युत केंद्र वरणगाव येथे पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी सदर डिमांड नोट भरली व डीपी मध्ये लोड वाढवलं.मनोज भाऊ जाधव यांची कामाची दखल घेतली व 29 ऑगस्ट संध्याकाळी 7 वाजेला पद दिवे सुरू करण्यात आले.या कामी नॅशनल हायवे चे साहेब केशव चौधरी यांच्यामार्फत सदरचा प्रश्न मार्गी लावले, ते म्हणतात की, मी कामात 80 टक्के समाजकार्य आणि 20 टक्के राजकारण करत असतो. असे ही मनोज भाऊ जाधव यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow