आष्टी मतदारसंघात दहशतमुक्तीसह अनेक विकास कामे करणार!माजी आमदार भीमराव धोंडे
आष्टी प्रतिनिधी: आष्टी विधानसभा मतदारसंघ दहशतमुक्त करणे,मतदार संघातील जास्तीत जास्त क्षेत्र ओलीताखाली आणणे, उर्वरित रस्त्यांची कामे पुर्ण करणे त्याचप्रमाणे बेकारीवर मात करण्यासाठी विविध उपाय योजना राबविणेआणि रेल्वेचा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न भविष्यात करणार असल्याचे अपक्ष उमेदवार व माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात माध्यमांशी संवाद साधताना अपक्ष उमेदवार व माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, आष्टी मतदार संघातून माझा विजय निश्चित आहे. कारण की मतदारांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे. कृष्णा खोरेचे पाणी कुकडीच्या माध्यमातून मतदार संघात आणले आहे, उर्वरित पाणी आणून मतदारसंघाचे जास्तीत जास्त क्षेत्र ओलीताखाली आणुन मतदारसंघ सुजलाम सुफलाम बनवायचा आहे. यासाठी भविष्यात प्रयत्न करणार आहे. तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बेकारीवर मात करण्यासाठी मतदारसंघात विशेष उपाययोजना करून तो प्रश्न मार्गी लावणार आहे. याकरिता मतदारसंघात दहा टेक्निकल संस्था सुरू करून त्या ठिकाणी युवकांना टेक्निकल प्रशिक्षण दिले जाईल. त्यामुळे युवकांना शहरात चांगल्या कंपन्यात नोकरी मिळू शकतील यातून बेरोजगारीवर निश्चित मात करता येईल. तसेच 2014 मध्ये मी आमदार असताना रस्त्याचे अनेक कामे केली आहेत. आता उर्वरित रस्त्यांचा प्रश्न येत्या पाच वर्षात पूर्णत्वास नेला जाईल तसेच रेल्वेचा प्रश्नही अंतिम टप्प्यात आहे, लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल असेही सांगितले.यासाठी मतदारांनी माझे चिन्ह असलेल्या शिट्टीला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले.
What's Your Reaction?