बीडमध्ये 11 मटकाबहाद्दर ताब्यात!

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई
शहरातील वंदना हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने सोमवारी सायंकाळी धाड टाकली. यावेळी 11 मटकाबहाद्दरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 77 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत मटका चालकासह 12 जणांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यावेळी या धाडीत जिजाबा तुकाराम काळे (रा.धनगरपुरा, बीड), बाळू बन्सीधर शेळके (रा.संत नामदेवनगर,बीड), शेख रईस शेख रहीम रा.बालेपीर, बीड), हौसराव आश्रोबा पाटील (रा.उमदर ता.बीड), नथुराम बन्सी क्षीरसागर (रा.खडकपुरा, बीड), प्रमोद व्यंकटराव टकले (रा.एमआयडीसी, बीड), डिगांबर सुंदरराव शेलार (रा.पाली ता.बीड), संजय आत्माराम शिंदे (रा.स्वराज्यनगर,बीड), विष्णू तुकाराम धनवडे (रा.पाली, बीड), नितीन आसाराम धायगुडे (रा.पिंगळे गल्ली,बीड), अशोक नामदेव गायकवाड (रा.अयोध्यानगर,बीड) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्यांना कल्याण, मिलन डे नावाचा मटका खेळताना मिळून आले. यांच्यासह मटका मालक राजू विठ्ठल लोखंडे असे 12 आरोपीविरुद्ध कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे (VILAS HAJARE), कर्मचारी सचिन काळे, शिवाजी डिसले, विनायक कडू यांनी केली.
What's Your Reaction?






