अबॅकस चॅम्पियनशिप मध्ये मयंक चौधरीचे यश
ओसाका जपान जागतिक ऑनलाइन अबॅकस आयोजित चॅम्पियनशिपमध्ये मयंक शैलेश चौधरीने मिळवले सर्वोत्कृष्ट ट्रॉफी आणि सायटेशन पारितोषिक
बीड (प्रतिनिधी) विविध कलागुणांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने, सुप्तगुणांचा विकास करण्याच्या मार्गाने अबॅकस गणितीय पध्दतीचा उपयोग होतो. देशामध्ये जापनीज अबॅकसची जास्त शिकवण पद्धतीत प्रचलित असल्यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास सातत्यपूर्ण अभ्यासातील क्षमता वाढत असते. अबॅकस आणि वैदिक मॅथ्स सारख्या पद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्य स्तरावर, अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये विद्यार्थ्यांमधील जन्मताच गुणांना संधी निर्माण करून दिली जाते. जागतिक स्तरावरील चेअरमन इंटरनॅशनल अबॅकस इन्स्टिट्यूट ओसाका जपान, मियाजमा अबॅकस इन्स्टिट्यूट ओसाका जपान, तैवान चेंबर्स ऑफ कॉमर्स, ओसाका चेंबर्स ऑफ कॉमर्स, पेन पॅसिफिक अबॅकस चीन तसेच अबॅकस अर्थमॅटिक अकॅडमी आंतरराष्ट्रीय अबॅकस असोसिएशन यांच्या सहकार्याने व समन्वयाने 26 मे 2024 च्या चॅम्पियनशिपमध्ये मयंक शैलेश चौधरीने किड्स सेकंडलेवल मध्ये भाग घेऊन 820 गुण मिळवून जागतिक स्तरांमधील सर्व द्वितीय येऊन पहिल्या तीन मध्ये सर्वोत्कृष्ट क्रमांक मिळविला आहे. अबॅकस जागतिक स्पर्धेमध्ये जपान चीन साऊथ कोरिया तैवान, भारत, श्रीलंका, सौदी अरेबिया, इराण, नॉर्वे, यु एस ए, मोरोक्को, सिंगापूर, मलेशिया, साऊथ आफ्रिका, कॅलिफोर्निया, नेपाळ, अशा एकूण 15 देशांमधील दोनहजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवला असून सदरील स्पर्धा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम फेसबूक, ट्विटर, यूट्यूब, झूम अशा सर्व चॅनल्सवर प्रसारित करण्यात आलेला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अतिशय प्रतिष्ठित समजले जाणारी अबॅकस इंटरनॅशनल सर्वोत्कृष्ट सर्व द्वितीय रँक मयंक शैलेश चौधरीने अतिशय कठीण गणितीय प्रश्न सोडविण्याचा ऐतिहासिक विक्रम त्याने केलेला आहे. आई-वडिलांच्या आणि शिक्षकांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे त्याला हे यश प्राप्त करता आलेले आहे असे त्याने सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय अबॅकस असोसिएशनचे आयोजकने मयंक चौधरीने मिळवलेल्या यशाचे अभिनंदन उज्वल पांडा ओरिसा, जी एस एस श्रीनिवासन राव दिल्ली, राष्ट्रीय अबॅकस कार्याध्यक्ष श्री सतीश मुलगे तसेच अबॅकस स्टडी सेंटरचे प्रमुख डॉ. घोडके एस ए. अभिनंदन केले असून उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. समाजातील सर्व स्तरांमधून मयंकचे अभिनंदन होत असून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. ऑक्टोबर 2024 ओरियंट अबॅकस इंटरनॅशनल चॅम्पियनशिप यु एस ए होणाऱ्या इंटरनॅशनल अबॅकस चॅम्पियनशिप करीता मयंक चौधरीची निवड झालेली आहे असे जिल्हा अबॅकस वितरक एस. ए. घोडके यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी अबॅकस उपयुक्त
विद्यार्थ्यांच्या उपजत गुणांचा विकास करण्यासाठी अबॅकस पध्दत फार उपयुक्त असून शालेय स्तरातील अभ्यासाला मुळातून मदत करण्याची, विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताबद्दलची भीती दूर करण्यासाठी अबॅकस उपयुक्त आहे असे अबॅकस मास्टर ट्रेनर एस. ए. घोडके यांनी सांगितले.
What's Your Reaction?