राजघाट व जंतर-मंतरम येथे आंदोलनासाठी दिल्ली येथे बैठक
बीड प्रतिनिधि: अखिल भारतीय मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती इंक्रेडीबल ग्रुप व लोकसेना संघटनेच्या वतीने सामाजिक नेते असलम इसाक बागवान व त्यांचा संघ सलग 40 दिवसा पासून पुणे ते दिल्ली विविध विषयाला घेवून पायी सामाजिक न्याय यात्रा करत आहे जसे क्रिश्चन मुस्लिमांना 1951 पूर्वीचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक व राजकीय आरक्षण लागू करावे. मराठा धनगर महिला आरक्षणासाठी संसदेत बील पास करावे. मोब्लिचिंग व जातीय दंगली पासून समाजाची सुरक्षा व्हावी करिता संरक्षण कायदा बनवावा, 1995 चा वक़्फ़ कायदा कायम ठेवता नवीन वक़्फ़ कायदा 2024 लागू न करता मागे घ्यावे, जातीयवादी वक्तव्य करुन धार्मिक तेढ़ निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर लगाम लावावी, जातीनिहाय जणगणना करावी, अल्पसंख्याक समाजाच्या अधिकाराचे संरक्षण व्हावे मुस्लिम रस्ते व शहरांची बदललेली नावे परत घ्यावे सोबत हिन्दू धर्माची व हिन्दू बांधवांची आस्था असलेल्या गाईचे रक्षण होण्यासाठी केंद्रीय स्तरावर गायहत्या बंदी करुन गाईला राष्ट्रीय पशु घोषित करावे, महिलांचे अत्याचारापासून संरक्षण व्हावे देशात समता न्याय बंधुता स्वतंत्रता लोकशाही धर्मनिरपेक्षता अबाधित राहून संविधानाचे रक्षण व्हावे या मागण्या घेवून लोकसेना संघटनेचे नेते असलम इसाक बागवान व त्यांचा संघ दोन ऑक्टाेबरला महात्मा गाँधी यांच्या समाधीवर राजघाटवर व तीन ऑक्टाेबरला दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन करणार या साठी दिल्ली येथे सामाजिक कार्यकर्ते सुलतान हिंदुस्तानी यांच्या निवासथानी बैठक संपन्न झाली बैठकीला सामाजिक कार्यकर्ते असलम इसाक बागवान लोकसेना प्रमुख ॲड. प्रा.इलियास इनामदार सुलतान हिंदुस्तानी डॉ. विखार अहमद मुजम्मिल फ़ारूक़ पटवेकर मोहम्मद रज़ी आबेद खान डॉ. शाहीद भाई व बहुसंख्येने सामाजिक कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते अशी माहिती ॲड. प्रा. इलियास इनामदार आहे.
What's Your Reaction?