कामगारांच्या पेन्शन वाढीसाठी 29 ऑगस्टला मंत्रालयात बैठक
बीड( प्रतिनिधी ) : देशातील विविध प्रकारच्या 186 खाजगी उद्योग व आस्थापनामध्ये काम करणाऱ्या 20 कोटी कामगारांना सेवानिवृत्तीनंतर किमान 9000 रुपये प्रति महा पेन्शन अधिक केंद्रीय महागाई भत्ता देण्याची मागणी निवृत्त कर्मचारी 1995 राष्ट्रीय समन्वय समितीने उचलून धरली आहे .2014 मध्ये भगतसिंग कोशारी कमिटीने यासंदर्भात घोषणा केली होती. मात्र त्यानंतर याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे ,तेव्हापासून ईपीएस-95 करिता सरकारकडे पाठपुरा समन्वय समिती करत आलेली आहे .नुकतीच 20 मे रोजी ईपीएस-95 ने संसद भवनातील कामगार मंत्रालयाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष भुर्तुहरी महताब यांच्यापुढे आपली भूमिका मांडली होती.यानंतर आता याकरिता देशातील बारा ट्रेड युनियनचे सीबीटी तथा सेंट्रल बोर्ड ट्रस्टी व संबंधित विषयातील तज्ञांना त्यांची भूमिका मांडण्यासाठी दिल्ली येथे 29 ऑगस्ट 2023 रोजी बोलविण्यात आले आहे. हा विषय देशातील सर्वच कामगारांच्या पेन्शनशी संबंधित आहे. ईपीएस 95 तर्फे निवृत्तीधारकांच्या किमान पेन्शनच्या सुधारणेचा प्रयत्न वर्ष 2008 पासून सुरू आहे. ई पी एफ ओ आणि केंद्र सरकारने 11 समित्या गठीत करून 2014 पासून ईपीएस 95 पेन्शनरच्या नूतन पेन्शनच्या वृद्धीसाठी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत घोषणा करूनही कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. 2014 चा भगतसिंग कोशारी सुधार अहवाल क्रमांक 147 उपलब्ध आहे. मात्र यातही 3000 ऐवजी फक्त एक हजार रुपये देऊन पेनर्सच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. यातून पेन्शनरच्या अन्न व औषधाचाही खर्च निघत नाही. 20 मे 2023 रोजी संसद भवनातील स्थायी समितीचे अध्यक्ष भुर्तुहरी महताब यांच्याकडे ईपीएस 95 संघटनेने आपली बाजू मांडली. कामगारांना मासिक 9000 रुपये अधिक केंद्रीय महागाई भत्ता, केंद्रीय सरकारी निवृत्त कर्मचारी यांच्याकरिता घोषित नोटिफिकेशन प्रमाणे कसे देता येईल, याबाबत विचार करावा, अशी मजबूत बाजू मांडली. 29 ऑगस्टला याच विषयावर बाजू मांडण्याकरिता लोकसभेच्या स्टॅंडिंग कमिटीने देशातील प्रमुख 12 कामगार संघटनांच्या सेंट्रल बोर्ड ट्रस्टी सदस्यांना पाचारण केलेआहे. 29 ऑगस्ट 2023 च्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या संघटना पुढील प्रमाणे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस ,ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, हिंद मजदूर सभा ,सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन, ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर, ट्रेड युनियन कोऑर्डिशन सेंटर, सेल्फ एम्प्लॉईड वूमन असोसिएशन, ऑल इंडिया सेंटर कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन, लेबर प्रोग्रेसिव्ह फेडरेशन, युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस, भारतीय मजदूर संघ आणि नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांच्या सीबीटी सदस्यांचा समावेश आहे .तज्ञांमध्ये ईपीएफ पेन्शनर्स असोसिएशन राष्ट्रीय समन्वय समितीचे समन्वयक एस धर्म राजन पीएच डी चेंबर कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ,असोसिएट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया व फेडरेशन ऑफ इंडिया व फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनाही पाचारण करण्यात आले आहे. देशातील 72 लाख निवृत्तीधारकांच्या वतीने ईपीएस-95 तर्फे सीबीटीचे सदस्य असलेले देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री ,संबंधित राज्यांचे कामगार मंत्री व कामगार संघटनांचे प्रतिनिधी व तज्ञ यांच्याशी संपर्क साधून कामगारांना 9000 पेन्शन व महागाई भत्ता देण्याच्या मागणीला समर्थन देण्याची विनंती केली असल्याची माहिती सेवानिवृत्त ईपीएस-95 राष्ट्रीय समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश यांचे, महासचिव प्रकाश पाठक, मराठवाडा विभागीय संघटक तथा बीड जिल्हाध्यक्ष डॉ.संजय तांदळे ,कोषाध्यक्ष सुदाम कोळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दिनांक 29 ऑगस्ट 2023 च्या दिल्ली येथील बैठकीत पेन्शनधारकांच्या मागण्या मान्य न झाल्यास पेन्शन नाही तर मतदान नाही असे देशव्यापी अभियान राबवत 29 नोव्हेंबर 2023 रोजी निवृत्त कर्मचारी ईपीएस 95 राष्ट्रीय समन्वय समितीच्या वतीने नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर महामोर्चा काढण्याचा इशारा देखील जिल्हाधिकारी कार्यालय बीड मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकत्याच पाठवलेल्या निवेदनाद्वारे केला आहे .
What's Your Reaction?