पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाचा अंदाज
हवामान:- शेतकऱ्यांची उभी पिकं वाया जाण्याच्या मार्गावर होती. मात्र, मागील तीन चार दिवसापासून सुरु झालेल्या पावसानं पिकांना जीवदान दिलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाण्याअभावी पीकं माना टाकू लागली होती. अशा पिकांना आता जीवदान मिळणार आहे. दरम्यान, राज्यातील मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. त्याचबरोबर वाशिम, नंदुरबार, पुणे, नाशिक जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली.
What's Your Reaction?