पुण्यात वाहनांची तोडफोड करून दहशत माजविणार्या 20 जणांवर मोक्का
पुणे : पुढारी वृत्तसेवा : सहकारनगर परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत माजविणारा गुंड दत्ता जाधव आणि त्याच्या 19 साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. टोळीप्रमुख दत्ता दीपक जाधव (वय 27), सचिन बबन अडसूळ (वय 29), ऋषीकेश ऊर्फ ऋषी राजू शिंदे (वय 24), अमित बाबु ढावरे (वय 22), … The post पुण्यात वाहनांची तोडफोड करून दहशत माजविणार्या 20 जणांवर मोक्का appeared first on पुढारी.


पुणे : पुढारी वृत्तसेवा : सहकारनगर परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत माजविणारा गुंड दत्ता जाधव आणि त्याच्या 19 साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. टोळीप्रमुख दत्ता दीपक जाधव (वय 27), सचिन बबन अडसूळ (वय 29), ऋषीकेश ऊर्फ ऋषी राजू शिंदे (वय 24), अमित बाबु ढावरे (वय 22), गणेश ऊर्फ दोड्या अनंत काथवटे (वय 22), प्रवीण बिभीषण जाधव (वय 34), ऋषीकेश रवी मोरे (वय 24), बबन अबू अडसूळ (वय 53), मनोज ऊर्फ भुनमय ऊर्फ भैया किसन घाडगे (वय 26), गणेश दीपक जाधव (वय 28), अक्षय मारुती दसवडकर (वय 27), अर्जुन ऊर्फ रोहित ऊर्फ रोह्या संतोष जोगळे (वय 19), रोहित ऊर्फ पप्पु भगवान उजगरे (वय 20), शेखर ऊर्फ सोनू नागनाथ जाधव (वय 30, रा. सर्व साठेनगर, संतनगर शिवदर्शन) आणि त्यांचे इतर साथीदार अशी मोक्कांतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
यातील चौदा जणांना पोलिसांनी अटक केली असून, चौघा विधीसंघर्षीत मुलांना ताब्यात घेतले आहे तर दोघांचा शोध सुरू आहे.
दत्ता जाधव आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना धाक दाखवून आम्ही येथील भाई आहोत, आमच्या कोणी नादी लागले तर त्याला संपवून टाकू, असे म्हणून फिर्यादींच्या घरातील साहित्याची तोडफोड करत रोकड काढून घेतली होती. त्यानंतर परिसरातील वाहनांची तोडफोड करून नुकसान केले होते. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासात दत्ता जाधव याने गुन्हेगारी टोळी तयार करून परिसरात वर्चस्व निर्माण केले होते. तसेच तो आर्थिक फायद्यासाठी टोळीच्या साह्याने संघटित गुन्हेगारी कृत्य करत होता. सहकारनगर, भारती विद्यापीठ, दत्तवाडी, स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याने खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदेशीर जमाव, शस्त्र जवळ बाळगणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल असून, प्रतिबंधात्मक कारवाई करूनदेखील टोळीने परत दत्तवाडी, स्वारगेट, भारती विद्यापीठ आणि सहकारनगर या भागात सक्रिय असल्याचे अभिलेखाची पडताळणी केल्यानंतर समोर आले आहे. टोळीत फूट पडून दोन टोळ्या होऊन त्यांनी वर्चस्ववादावरून आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पुन्हा-पुन्हा गुन्हे केले आहेत.
टोळीवर सहा गुन्हे एकत्रित केल्याची नोंद आहे. तर स्वतंत्रपणे तीन असे एकूण 9 गुन्हे केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव सहकार नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्तना पाटील यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांना सादर केला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
What's Your Reaction?






