बीड जिल्हात होत आहेत सर्वाधिक बाल विवाह
३० दिवसात रोखले तब्बल ३७ बालविवाह
बीड जिल्हात होत आहेत सर्वाधिक बाल विवाह . हि आकडेवारी (Beed) कमी करण्यासाठी प्रशासन आणि चाईल्ड लाईन कामाला लागले आहे. मे महिन्याच्या ३० दिवसांमध्ये तब्बल ३७ बालविवाह (Child Marriage) रोखण्यात चाईल्ड लाईन यश आले आहे. (Breaking Marathi News)
Child Marriage
बालविवाह करण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे आता प्रशासन हे चाईल्ड लाईनच्या मदतीने ग्राउंडवर लेवल वर फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. जिथं माहिती मिळेल तिथं जाऊन संबंधित पालकांचे मार्गदर्शन करून हे होणारे बालविवाह रोखण्यात येत आहेत.
बीड जिल्ह्यात आज देखील एक होणारा बालविवाह चाईल्ड लाईनचे तत्त्वशील कांबळे आणि ग्रामसेवकाने रोखला आहे. दरम्यान बालविवाहाची भीषणता बीड जिल्ह्यात पाहायला मिळत असताना आता बालविवाह रोखण्यात प्रशासनाने चाईल्ड लाईनच्या मदतीने पाऊल उचललं असल्याने बालविवाहाची आकडेवारी कमी होण्याची शक्यता आहे.
What's Your Reaction?






