गिरी वस्तीवर 58 वर्षीय इसमाचा खून

धारूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये असणाऱ्या गिरी वस्तीवर एक 58 वर्षीय इसमाचा तीक्ष्ण हत्याराणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल होऊन सदर घटनेचा पंचनामा केला.
धारूर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गेली दोन दिवसांपूर्वीच एक खुणाची घटना घडली होती त्यानंतर आज धारुर पोलिस हद्दीत दुसरी खूनाची घटना घडली. धारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथील गिरी वस्तीवर तीक्ष्णहत्याराणे निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दत्तात्रय रामभाऊ गायके (वय 58 ) असे त्या इसमाचे नाव आहे या इसमाचीची तीष्ण हत्याराने सपासप वार करुन हत्या करण्यात आली. सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी पंकज कुमावत ,सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे ,पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन भेट दिली. व घटनेचा पंचनामा केला याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?






