माझ्या बाळाला समजते, पण बोलता येत नाही
माझ्या मुलाला बोलता येते, पण तो अर्थपूर्ण बोलत नाही", '“माझा मुलगा नुसतेच
अनुकरण करतो, पण याचा संपर्कासाठी Communication उपयोग करत
नाही”".... अशा अनेक काळज्या ऑटिझम असलेल्या मुलांच्या पालकांच्या
असतात. त्यासाठी साठी त्यांना वाचा तज्ज्ञांकडे पाठवले जाते, जेणेकरुन ते सर्वसामान्य
मुलांप्रमाणे बोलावीत अशी अपेक्षा असते.
जेव्हा ऑटिझम असलेला बालक सर्वप्रथम Speech Therapist कडे येतो,
तेव्हा त्याच्या भाषेची समज व अभिव्यक्ति, वाचेची व त्याच बरोबर भाषा व वाचा
यांच्या झालेल्या विकासाचा वापर कसा होत आहे (Pragmatics of Language)
याची चाचणी केली जाते. या चाचण्यांमध्ये असे आढळून येते की ऑटिझम
असलेल्या मुलांमध्ये प्रामुख्याने ३-४ समस्या आढळतात. जसे उदा. भाषेची
समज (comprehension) त्यांच्या वयापेक्षा कमी असते. त्यापेक्षाही कमी
अभिव्यक्तीची पातळी असते. कित्येक वेळा भाषेची वाढ किती झाली आहे याचा
अचूक अंदाज येणे कठीण जाते. याचे मुख्य कारण असे दिसते की आपण बोललेली
भाषा जरी त्यांना समजली असली, तरी त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हेच त्यांना
येत नसते. बरेच वेळा मग मुल ऐकतच नाही की काय, की मुद्दाम लक्ष देत नाही अशी
शंका पालकांच्या मनात येते. या समस्येमुळे बऱ्याचदा मुले निरर्थक अनुकरण
(echolalia) करतानाही आढळतात व काही प्रमाणात वारंवार अनुकरण केलेली
वाक्ये संपर्कासाठी वापरतात. जसे आपण विचारतो - “तुला बिस्किट हवे का?"
व बिस्किट देतो. याच प्रश्नाचा वापर बिस्किट मागण्यासाठी मुलं करतात.
या संपर्क, भाषा व वाचा यांच्या समस्येबरोबरच तोंडाच्या पोकळीची
अतिसंवेदनशीलताही बर्याच मुलांमध्ये असते. याचा परिणाम खाणे, चावणे व त्याच
बरोबर वाचेवर होतो.
मग यावर तोडगा काय? या समस्यांवर मात कशी करायची? हे प्रश्न
पालकांच्या मनात सदैव घोळत असतात. प्रत्येक मुलाची व पालकांची समस्या जरी
वेगवेगळी असली, तरी काही सूचना सर्वांना कमी जास्त प्रमाणात लागू होऊ
शकतात. यातील काही सूचना खाली नमुद केल्या आहेत.
आपल्या पाल्याशी सदैव बोलत रहा. तो जी क्रिया करत असेल, त्याच्या मनात
जे विचार चालू असण्याची शक्यता आहे, किंवा तुम्ही जे काही करत असाल
त्याबद्दल बोलत रहा. थोडक्यात वातावरण भाषेने तुडुंब भरुन टाका.
बालगीते, गाणी व गोष्टी स्वत:च्या आवाजात व हावभावात मनोरंजकता आणून
म्हणा व त्यावर हावभाव करायला शिकवा. सी.डी./ मोबाईल चा वापर करा.
लोकांशी संपर्क वाढवून निर्जीव उपकरणांशी संपर्क कमी करून आपल्या पाल्याला
संपर्काला प्रतिसाद द्यायला शिकवा. यासाठी घरातील ताल प्रत्येक व्यक्तीने सहभागी
व्हावे व योग्य प्रतिसाद कसा द्यायचा याचे प्रात्यक्षिक करावे/करुन दाखवावे व
पाल्याने अगदी किंचित प्रमाणात प्रयत्न केला तरी त्याचे कौतुक करावे.
प्रतिसाद देणे किंवा संपर्क करणे यासाठी बोललेच पाहिजे हा अट्टाहास करु
नका. सर्व प्रथम व्यक्त करणे हे महत्वाचे त्वार्च आहे. मग त्यासाठी अभाषिक भाषक म्हणजेच णजंच
शब्द न वापरता संवाद साधला तरी चालेल. लेल. त्यात वस्तूकडे बोट दाखविणे, विण, चित्राचा चा
वापर करणे किंवा वस्तूच्या नावाची शब्दचिठ्ठी दाखवणे याचा समावेश करु शकतो.
याच बरोबर हातवारे स्वत: करा व आपल्या पाल्याला हातवारे करण्यास प्रोत्साहित
करा / शिकवा. या अभाषिक माध्यमांचा वापर केल्याने वाचेची वाढ खुंटत नाही तर
संपर्कताण न घेता सहज झाल्याने वाचा अधिक सहजपणे विकसित होण्यास मदत
होते. असे अनेक संशोधनांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे आपल्या पाल्याची
बलस्थाने काय आहेत हे ओळखून त्या प्रमाणे वाचा तज्ज्ञांच्या सहाय्याने संपर्काचे
माध्यम शोधून काढा व त्याचा वापर लवकरात लवकर सुरु करा.
आपण आपल्या पाल्याच्या सर्व गरजा समजून असतो व वेळेनुसार न सांगता
पूरवत ही असतो. ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. परंतु याचा परिणाम असा होतो
की पाल्याला संपर्क करण्याची गरज उरत नाही. ही गरज निर्माण करा. त्याच्या
आवडीच्या वस्तू त्याला दिसतील पण हाताला लागणार नाहीत हीत अशा ठेवा वत्या पुर्व
नियोजित पद्धतीने मागण्यास शिकवा /कसे मागायचे याचे प्रात्यक्षिक करा.
तोंडाभोवतालच्या भागाची अतिसंवेदनशीलता कमी करण्यासाठी विशिष्ट
पद्धतीने चेहऱ्याचा व तोंडाचा मसाज करा (बोटांनी व विविध ब्रशच्या साह्याने).
याचबरोबर मूल लहान असल्यापासून त्याला विविध चवी व स्पर्शाचे पदार्थ
खाण्याची सवय असू द्या.
या सर्व गोष्टी करत असताना हे विसरू नका की आपले मूल हे आधी एक मूल
आहे आणि मग त्याला ऑटिझम आहे. त्यामुळे त्याच्याशी खूप बोला. खूप खेळा व
आपल्या बाळाचे बालपण आनंदाने अनुभवा.
What's Your Reaction?