राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिंदे गटात येणार - जयंत पाटील

राज्याच्या राजकारणात सध्या आगामी महापालिका निवडणूक , विधानसभा तसेच लोकसभा निवडणूकांचे वेध लागले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे सर्वच पक्ष संघटना मजबूत करण्याच्या प्रयत्नात चालू असताना सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

सोलापूरमधील राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने चर्चा रंगल्या आहे . मात्र याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र ते परवानगी घेवूनच गेल्याचे सांगितले आहे..

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ज्यामध्ये त्यांनी सोलापूरमधील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मोठे विधान केले. (Latest Marathi News Beed )

काय म्हणाले जयंत पाटील...

याबद्दल बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, शिंदे गटात गेलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे तात्पुरत्या काळासाठी गेले आहे. शिंदे गटाची जोपर्यंत सत्ता आहे. तो पर्यंत काही सोयी सवलती मिळतील म्हणून ते शिंदे गटात गेले आहेत.. 

तसेच याबद्दल पुढे बोलताना "एका कार्यकर्त्याने साहेब सहा महिने जातो निधी घेऊन येतो, निधी मिळाल्यावर परत येतो", अशी परवानगी घेतल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. जयंत पाटील यांच्या या दाव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow