बीड जिल्ह्यासाठी नंदीबैलाने दिले हे संकेत
(बीड प्रतिनिधी) : पूर्वी पासून गाव खेड्यात नंदीबैल घेऊन येणारे पहावयास मिळायचे गुबू गुबू असा आवाज घुमायचा व लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्ध देखील नंदीला पाहण्यासाठी गर्दी करायचे आज हे दृश्य दुर्मिळ झालेले असून बीड शहरातील आदर्श गणेश नगर येथे नंदीबैल पाहण्यास मिळाला. नंदी बैलाचे मालक पांडुरंग राघोजी गोंडे हे मेंडगी जोशी समाजातील असून राहणार येवता तालुका केज जिल्हा बीड येथील असून ,नंदी बैलांचा हा पारंपारिक व्यवसाय त्यांचा पिढी जात असून ते महाराष्ट्र राज्यसह भारतातील इतर राज्यात देखील सारखी भ्रमंती करत असतात त्यांचे पाच जणांची कुटुंब असून त्यांचा उदरनिर्वाह याच नंदी बैलाचा खेळ दाखवून होत आहे. बैलास दररोज अर्धा किलो बदाम , अर्धा किलो काजू अर्धा किलो राईचे तेल लागत असून चाऱ्यासह त्याचा दररोजचा खर्च दोन हजार रुपये खर्च चालू आहे. दिवसभरात तीन ते चार हजार रुपये बैलाचा खेळ दाखवून जनतेतून मिळतात त्यावर त्यांची कशीतरी उपजीविका सध्या चालू असून शासनाच्या कोणत्याही योजना अद्याप पर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ संजय तांदळे यांच्याशी संवाद साधताना त्यांनी दिली हवामान बदल ही एक गंभीर समस्या निर्माण झाली असून ती सध्या देशभरात अनुभवली जात आहे हवामान बदलामुळे पाऊस पडण्याचं वेळापत्रक सातत्याने बदलताना दिसत आहे.नुकताच हवामान खात्याने येत्या आठ दिवसात महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तसेच नंदी बैलाच्या मालकाने हा विषय घेत नंदीशी बोलताना बीड जिल्ह्यात या आठवड्यात पाऊस पडेल का असा एक प्रश्न विचारल्यानंतर नंदीबैलाने होकारार्थी मान हलवत जिल्ह्यात पाऊस पडण्याचे भाकीत वर्तवले व नंदीबैलाच्या काही कसरती दाखवल्या.
What's Your Reaction?