नंदुरबार लोकसभा क्षेत्र कुपोषण मुक्त करणार !पावरा
नंदुरबार प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्यात कुपोषित बालकांची संख्या २८ हजार आहे.त्यापैकी २३ हजार कुपोषित बालके एकट्या नंदूरबार जिल्ह्य़ात आहेत. नंदूरबार जिल्ह्य़ात कुपोषण व बालमृत्यूची संख्या गंभीर आहे. नंदूरबार जिल्ह्य़ात एकही कुपोषित बालक नाही,कुपोषण झिरो टक्के आहे,असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी राज्याच्या अधिवेशनात विधानसभेत केले होते.त्यावर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता.देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत बालमृत्यू रोखणे व कुपोषण निर्मूलन या नावाखाली सरकार कोटी रूपये खर्च करते,परंतु अद्यापही बालमृत्यू व कुपोषण रोखू शकले नाही.कारण ठोस अंमलबजावणी होताना दिसत नाही.आदिवासी भागात आरोग्य सुविधांकडे सरकारचे व आरोग्य विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.नंदूरबार जिल्हा, तालुका व केंद्रातील रूग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव आहे,रिक्त पदे भरली जात नाहीत.आरोग्य केंद्र हे दुर्गम भागातील खेडेगावातून दूर अंतरावर आहेत.
रस्ते नाहीत, वाहतूकीची सोय नाही,रूग्णवाहिकेची सोय नाही.त्यामुळे नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात दरदिवशी बालके व गर्भवती मातांचा मृत्यू होत आहे.म्हणून प्रत्येक गांवात सरकारी रूग्णालय होणे आवश्यक आहे.रूग्णालयातील रिक्त पदे त्वरित भरणे आवश्यक आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲम्बुलन्स बंद पडल्याने एका गरोदर मातेचा मृत्यू झाला होता,त्यानंतर धडगांव तालुक्यात मुदतबाह्य सलाईन लावल्यानंतर ८ महिन्याच्या बालिकेचाही दुर्दैवी मृत्यू झाला.नंतर एका बाळंतीण मातेला ३५ किलोमीटर गावापासून दूर अंतरावर सोडून एम्बुलन्स चालक फरार झाला होता.अशा आरोग्य बाबतीतच्या घटना दररोज घडत आहेत. यावर बिरसा फायटर्स संघटना वारंवार प्रशासनास निवेदन देऊन आवाज उठवत आहे.या भागात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे बिघडलेली आहे.म्हणून नंदूरबार लोकसभाश्रॆत्र कुपोषण मुक्त करणे,आरोग्य साधनसुविधा वाढवणे व प्रत्येक गांवात सरकारी दवाखाना सुरू करणे हे आमचे प्राथमिक ध्येय असेल. अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
What's Your Reaction?