नेकनूर रुग्णालयाच्या काचा फोडून दारुड्याने गोंधळ घातला
बीड प्रतिनिधी- बीड तालुक्यातील नेकनुर येथील स्त्री व कुटीर रुग्णालयामध्ये दारुड्याने शनिवारी रात्री गोंधळ घातला. रुग्णालयाच्या काचा फोडून रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये दहशत निर्माण केली. संबंधितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बीड तालुक्यातील नेकनुरच्या स्त्री व कुटीर रूग्णालयामध्ये एका दारूड्याने चांगलाच गोंधळ घातला. कर्मचार्यांना शिवीगाळ करत रूग्णालयाच्या काचा फोडल्या. सदरील दारूड्या विरोधात नेकनुर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्या मद्यपीने रुग्णालयात दाखल होताच महिला व इतर कर्मचार्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्या दारूड्याने रूग्णालयाच्या काचाची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला . प्रकाश बन्सी शिंदे असे त्या व्यक्तीचे नाव आहे. नेकनूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत
What's Your Reaction?