चोरीला गेलेले 10 तोळे सोने नेकनूर पोलिसांनी केले रिकव्हर

पोलीस ठाणे नेकनूर गुरनं 106/2023 कलम 457,380 भादंवि गुन्हयातील चोरीस गेलेला मुददेमाल (10 तोळे सोने 4 लाख रुपये. कि. अं.) रिकव्हर करण्यात पोलीस ठाणे नेकनूर येथील पथकास यश आले आहे.
फिर्यादी नामे श्रीराम गोवर्धन जगताप वय 39 वर्षे रा. शिक्षक कॉलनी नेकनूर यांनीदि.08.05.2023 रोजी समक्ष पोलीस ठाणेस येवून फिर्याद दिली की, दि.03/05/2023 रोजी आम्ही परिवारासह वैष्णव देवी येथे जातांना त्यावेळी मी माझ्या पत्नीच्या गळयातील सोन्याचे दागिने चांदीचे दागिने व रोख रक्कम माइया घरातील कपाटामध्ये ठेवलेले होते. मी वैष्णव देवी जम्मु काश्मीर येथे असतांना दि.06/05/2023रोजी दहा वा. चे सुमारास मला माझ्या मोबाईल फोनवर आमचे शेजारी राहणारे प्रकाश यादव ( लाईनमन) यांचा फोन आला व त्यांनी मला सांगितल की. तुमचे घराचे लॉक तोडलेले दिसत आहे व घरातील सर्व सामान अस्थाव्यस्थ पडलेले आहे. तसेच कपाट देखील उघडे दिसत आहे. तुमच्या घरात चोरी झाली आहे. व माझ्याही घराचा दरवाजा रात्री अंदाजे 01.00 ते 03.00 वाचे सुमारास बाहेरून बंद केला होता, असे सांगितले. तेव्हा मी फोन करून माझे चुलते नाम जनार्धन जगताप व शेजारी प्रकाश यादव यांना पोलीस स्टेशनला कळवा असे सांगितले. तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनला जावून चोरीची माहिती दिली. त्यावेळी पोलीस तात्काळ माझ्या घरी येवून पंचनामा करून तपास सुरु केले. माइया घरात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागदागिने असे एकुण 14 तोळे सोने व 15000 रुपये रोख रक्कम असे एकुण 4,80,891 रुपयांचा मुददेमाल अज्ञात चोरटयाने चोरून नेले बाबतचे तक्रारीवरून पोस्टे नेकनूर येथे गुरन. 106/2023 कलम 457,380 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद असुन सदर गुन्ह्याचा तपास सपोनि श्री. शेख सो यांचे आदेशाने पोउपनि श्री. जाधव यांचेकडे देण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये वरिष्ठांनी सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश दिलेले दिलेले होते. तपासामध्ये गुन्हयाचे घटनास्थळाचे डमडाटा, संशईतांचे सी. डी. आर व टॉवर लोकेशन घेण्यात आले. तसेच गुन्हयाचे घटनास्थळाचे आजुबाजूचे सी. सी.टि.व्ही. फुटेज तपासण्यात आले. तसेच सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल व अज्ञात आरोपीचे माहिती काढणे कामी गोपनीय बातमीदार नेमण्यात आले. सदर गुन्हयात गोपनीय बातमीदाराच्या आधारे सदरील गुन्हा वडमाऊली दहिफळ येथील पालावर राहणारे लखन भिमराव एरंडकर व त्याचे साथीदार राजु प्रकाश मंजूळकर व करण ऊर्फ सिन्हा रामचंद्र मंजुळकर यांनी केल्याचे माहिती प्राप्त झाले वरून तात्काळ सदर गुन्हयातील आरोपीतांची माहिती काढता आरोपी लखन भिमराव एरंडकर हा गुन्हा झालेपासून भिवंडी येथील पिंपळास गावात राहत असल्याचे गोपनीय माहिती प्राप्त झालेवरून सदर ठिकाणी पोउपनि श्री. जाधव, पोना / 727 बांगर, पोका /1885 क्षीरसागर असे सदर ठिकाणी जावून आरोपीचा शोध घेत असताना नमुद आरोपी हा पोलीसांना पाहून पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्यास तात्काळ ताब्यात घेवून त्याचेकडे विचारपुस करता त्यांनी गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास पो.स्टे. आणून अटक करून त्याचेकडे तपास करता त्याने तपासात त्याचे साथीदारासह गुन्हा केल्याचे कबुल करून गुन्हयातील चोरलेले मुददेमाल 10 तोळे सोने काढून दिल्याने सदरील मुददेमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे. सदरच्या कामगिरी मुळे यातील तक्रारदार यांनी तपास पथकाचे आभार व्यक्त केले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री.नंदकुमार ठाकुर, पोलीस अधिक्षक, मा. कविता नेरकर, अपर पोलीस अधिक्षक मा.श्री. पंकज कुमावत, सहा. पोलीस अधिक्षक, व मा. श्री. मुस्ताफा शेख पो.स्टे. प्रभारी अधिकारी नेकनूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विलास जाधव पोउपनि, पोलीस नाईक 727 सुखदेव बांगर, पोलीस अंमलार / 1885 विशाल क्षीरसागर यांनी केले आहे.
What's Your Reaction?






