मनोज जरांगे पाटील यांना सुरक्षा द्या नितीन सोनवणे
बीड प्रतिनिधी:- मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणेवर आला आहे. कालची झालेली जी घटना आहे. त्या घटनेत एखादा समाजाचा नेता आपल्या घरी असतांना त्यांच्या घरावरुन ड्रोन कैमेरा फिरतो. आणि तो कोणाचा होता हे माहित नसण ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणजेच महाराष्ट्रातील करोडो मराठा समाजाचे दैवत असल्याची प्रतिमा निर्माण झाली असून त्यांना काही हानी पोहचल्यास महाराष्ट्राचं वातावरण बिघडणार नाही याची हमी काय ? तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत लोकशाही मार्गाने समाजाच्या हिताचा लढा देण्याऱ्याची सुरक्षा करणे हे आपल्या घटनेत नमुद असून अशा लोकांची सुरक्षा ही हितकर ठरते. याच्यासाठी सामाजिक सलोखा आबाधित ठेवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा ही महत्त्वाची ठरते. म्हणून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात यावी अशी नितीन सोनवणे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅथर सेना, वशीम भाई शेख, सचिव, कावेरी जाधव महीला शहर अध्यक्ष, दयाबाई वाघमारे यांची मागणी आहे.
What's Your Reaction?