वृद्धाचा आढळला मृतदेह

बीड तालुक्यातील तांदळवाडी भिल्ल येथील एका साठ वर्षीय वृद्धाचा पिंपळवाडी शिवारामध्ये मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदरील प्रकार हा घातपाताचा संशय असल्याचे व्यक्त केले जात आहे.
बीड तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या पिंपळगाव शिवारात एका 60 वर्षीय वृद्धाचा मृतदेह एका रस्त्याच्या बाजूला आढळून आला. भागवत अश्रुबा नगदे राहणार तांदळवाडी भिल्ल असे त्या मयत वृद्धाचे नाव आहे .सदरील मृतदेहाच्या अंगावर मारलेले खुणा तसेच गळा दाबलेल्या निशान होत्या.सदर मृतदेह हा शव विच्छेदनासाठी पाठवला असून सदर मृतदेहाकडे पाहून नातेवाईकासह नागरिकांनी घातपाताचा संशय असल्याचे व्यक्त केले. मात्र शवच्छेदनानंतर याचे कारण नेमके काय ?आहे हे समजू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली.
What's Your Reaction?






