गोमळवाडा येथे एक तारीख एक तास स्वच्छता अभियान संपन्न
सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांनी ग्रामस्थांसह राबविली स्वच्छता मोहीम
शिरूर कासार:- तालुक्यातील गोमळवाडा येथे शासनाच्या एक तारीख एक तास स्वच्छता मोहीमेच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थ व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कर्मचारी यांना सोबत घेऊन सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांनी हातामधे झाडु घेत स्वच्छता मोहीम राबविली.
शासनाने 2 आक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्त संपूर्ण देशभर एक तारीख एक तास स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी नागरीकांना आवाहन केलेले असून याच आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थ व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कर्मचारी यांना सोबत घेऊन सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांनी हातामधे झाडु घेत स्वच्छता मोहीम राबविली.यावेळी प्रथम जेष्ठ नागरीक शिवाजी बापू शिंदे यांच्या हस्ते महात्मागांधीजी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन मोहीमेची सुरूवात करण्यात आली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांचेसह जिल्हापरिषद शाळेच्या मुख्याध्यापक श्रीम.अर्जना पारवे मॅडम,खेडकर मॅडम,सुदाम पवारसर,अनिलदेवा कुलकर्णी,चांगदेव सुरे,बाबासाहेब काकडे,मुरलीधर कातखडे,राम पवार,सुनिल काकडे,दत्तु सुरे,तुकाराम पाटोळे,भिवाजी साळवे,हौसराव पवार,दिनकर निंबाळकर,डिंगांबर काकडे,महादेव काकडे,छगन तावरे,बाळु पवार,अक्षय मोरे,अर्जुन पवार,भिमराव सुरे,बिभिषण काकडे,नाना कातखडे,रावसाहेब बारगजे,देवा गायकवाड,अमोल कदम,हारीभाऊ सुरे यांचेसह शाळेतील कर्मचारी तसेच गावातील जेष्ट,वडीलधारी मंडळी,यूवक,ग्रामस्थ व विधार्थी यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला होता.
What's Your Reaction?