काँग्रेसचे 9 मार्चला एक दिवशीय शिबीर
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन.
मुबई प्रतिनिधी:- लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेस सज्ज असून पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्या दिनांक ९ मार्च रोजी म्हाडा कॉलनी, मुलुंड येथील आर. आर. सभागृहामध्ये एक दिवसाचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरीचे ऑनलाईन उद्घाटन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे करणार आहेत. तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मार्गदर्शन करणार आहेत.
मुंबई काँग्रेसच्या या शिबिरात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया आणि प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष पवन खेरा हे ‘लोकशाही आणि चौथा स्तंभ’,यावर व्याख्यान देणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांचे ‘निर्भय बनो’, नेहा राठोरे यांचे ‘सत्ताधारी सरकारचा अत्याचार’, राजकीय विश्लेषक, अभ्यासक मा. हेमंत देसाई यांचे कॉंग्रेस आणि ७० वर्ष, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचे ‘बोलना जरुरी है’, आणि नॅशनल वॉर रुमचे अध्यक्ष शशिकांत सेंथिल यांचे व्याख्यान होणार आहे. शिबिरानंतर संध्याकाळी ५.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे.
What's Your Reaction?