दुचाकीवरून सेल्फीच्या नादात बीड बायपास वर एक ठार तरी गंभीर

दुचाकीवरून सेल्फीच्या नादात बीड बायपास वर एक ठार तरी गंभीर

बीड प्रतिनिधी :- सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. एखादे निसर्गरम्य ठिकाण दिसूदेत नाहीतर कोणी सेलिब्रिटी व्यक्तीची भेट असूदेत प्रत्येकजण हा क्षण सेल्फीच्या माध्यमातून कैद करण्याचा प्रयत्न करतो. पण सेल्फीचा हाच नाद कधीकधी जीवघेणा ठरू शकतो त्याची प्रचिती बीडमधील धक्कादायक घटनेतून मिळाली आहे.येथे दुकाचीकवरून प्रवास करत असताना सेल्फी काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जण गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीवर मागे बसलेला तुरण सेल्फी कॅमेऱ्याच्या माध्यमातून रिल काढत होता. बाईक वेगात चाललेली असताना तो मागे वळून पाहून कॅमेऱ्याला बोटांनी व्हिक्टरी साईन दाखवत होता. विशेष म्हणजे बाईक चालवत असलेला तरुणदेखील रिल तयार करण्यासाठी फोनमध्ये बघण्याचा प्रयत्न करत होता.याचवेळी एका क्षणात त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झालाय. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली आहे. अपघात होतानाची दृश्ये या दोन तरुणआंनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. यातील मृत तरुणाचे नाव आनिरुध कळकांबे असून तो जालना जिल्ह्यातील गणेश पूरमधील रहिवाशी आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow