आकाशवाणीसाठी वार्ताहर म्हणून काम करण्याची संधी
प्रसार भारतीच्या वतीनं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत मुंबई, रत्नागिरी, परभणी, नांदेड, लातूर, बीड आणि सांगली या जिल्ह्यांसाठी कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. २४ ते ४५ वयोगटातले पात्र उमेदवार यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील. यासाठीची पात्रता, अर्जाचा नमुना तसंच इतर माहिती प्रसार भारती डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश पी बी व्हॅकेन्सिंज या दुव्यावर उपलब्ध आहे. इच्छुकांना एअर न्यूज पॅनल ट्वेंटी ट्वेंटी टू अॅट जीमेल डॉट कॉम (AirNewsPanel2020@gmail.com) या ईमेल आयडीवर आपले अर्ज पाठवता येतील.
What's Your Reaction?