शहरातील पार्किंग व्यवस्थे संदर्भात आदेशित करा! दिव्यांग संघटनेची मागणी

शहरातील पार्किंग व्यवस्थे संदर्भात आदेशित करा! दिव्यांग संघटनेची मागणी

बीड प्रतिनिधी:-  शहरातील सार्वजनिक प्राधिकरणांना स्वतंत्र वाहनतळ ( Parking) व्यवस्था उपलब्ध करण्याविषयी आदेशित करण्याची जिल्हा पोलिस अधीक्षक बीड यांच्याकडे शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष यांची तक्रार.

बीड शहरात हॉटेल, उपहारगृहे, बियर बार, व्यावसायिक अस्थापनेअंतर्गत दुकाने, या सार्वजनिक प्राधिकरणांतर्गत ग्राहकांना सेवा पुरवताना या प्राधिकरणाकडे स्वतंत्र वाहनतळ ( Parking ) व्यवस्था नसल्याने या गैरवाजवी व्यवस्थेचा त्रास दिव्यांग व्यक्ती, जेष्ठ नागरिक, भिक्षुकरी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना होत आहे व ही व्यवस्था प्राधिकरणाने अक्षरशः रस्त्यावर ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

यामुळे मार्गावरील रहदारीस वाहतुकीचे नियंत्रण करणार्या पोलिस बांधवांनाही या बाबींचे संनियंत्रण करताना सर्वसामान्य नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. हीच बाब शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने गांभिर्याने विचारात घेऊन जनहितार्थ जिल्हा पोलिस अधीक्षक बीड श्री . नंदकुमार ठाकूर यांच्याकडे या गैरकृत्याचे समुळ उच्चाटन करण्याकरिता लेखी तक्रार केली आहे. तसेच या तक्रार निवेदनाद्वारे सचिन बीड जिल्हा विधी प्राधिकरण जिल्हा न्यायालय बीड यांनाही अवगत केले आहे. 

यास्तव सार्वजनिक प्राधिकरणांनी स्वयंप्रेरणेने प्राधिकरणाच्या जागेत ग्राहकांना सेवा पुरवठा करताना स्वतंत्र वाहनतळ ( Parking ) व्यवस्था करणे बंधनकारक असुन सार्वजनिक प्राधिकरणांनी रस्त्याचा वापर वाहनतळ ( Parking) व्यवस्थेकरीता करण्यात येवू नये या स्वरूपाचे मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय अंमलात असुन या निर्णयाचे तंतोतंत व काटेकोर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अनुपालन करण्यात यावे असेही पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. म्हणून शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या तक्रारीवर जिल्हा पोलिस अधीक्षक बीड हे योग्य ती कार्यवाही करतात का ? याकडे बीड जिल्ह्यातील जनतेसह दिव्यांग बांधवांचे अवचुक्याचे लक्ष लागले आहे. अशी माहिती शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी जनहितार्थ प्रसिद्धीपत्रकान्वय कळवली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow