पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला

बीड प्रतिनिधी: भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज बुधवारी बीड लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
भाजपच्या बीडमधील लोकसभा उमेदवार पंकजा मुंडेंनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री धनंजय मुंडे आणि इतर स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. भरण्यापूर्वी पंकजा मुंडेंनी घरी पूजा केली. त्यानंतर आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर मुंडे भगिनींनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांचे विधीवत दर्शन घेतलं. तसंच गोपीनाथ गडावर जाऊन, गोपीनाथ मुंडेंच्या समाधीपुढे त्या नतमस्तक झाल्या. अर्ज भरल्यानंतर पंकजांनी मोठी रॅली काढत शक्तिप्रदर्शन केलं. बीडमध्ये पंकजा यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे निवडणूक लढवत आहे. पंकजा मुंडेंचा फॉर्म भरताना त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आर्यमन देखील उपस्थित होता. आर्यमनसहसा राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत. मात्र आईसोबत आज प्रथमच दिसल्याने लक्ष वेधले. या विषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, तो नेहमीच माझ्यासोबत असतो. तो मला सरप्राईज देण्यासाठी आला आहे.
What's Your Reaction?






