जनतेच्या समस्या साठी पाटोळे यांनी घेतली गटविकास अधिकाऱ्यांची भेट

पाटोदा / प्रतिनिधी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी आल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटोळे यांनी तालुक्यातील विशेषतः अंमळनेर गटातील अनेक गावांना भेट देऊन गावकऱ्याशी संवाद साधल्यानंतर गावकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. आणि पाटोदा तालुक्याचे गटविकास अधिकारी उध्दव सानप साहेब यांना आदेश देताच सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आपापल्या ग्रामपंचायत मध्ये उपस्थित राहू लागले. त्यामुळे पाटोदा तालुक्यातील सर्व गावातील गावकऱ्यांनी सुरेश पाटोळे यांचे मनःपुर्वक आभार मानले आहेत.
पाटोदा तालुक्यात ग्रामसेवक कर्मचाऱ्यांची संख्या कमी आणि ग्रामपंचायत जास्त आहेत. एका ग्रामसेवक कर्मचाऱ्याकडे दोन किंवा तीन ग्रामपंचायतचा चार्ज असल्याने त्यांना उपस्थित राहता येत नसल्याचे कारण ग्रामसेवक व बिडियो यांनी पुढे केल्याने शिव संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटोळे यांनी वारानुसार वेळापत्रक तयार करून गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात कोणत्या वारी ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये उपस्थिती राहणार आहेत. यांचा फलक ग्रामपंचायतच्या दर्शनी भागामध्ये लावण्यात यावा जेणेकरून सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना आपापली कामे ग्रामसेवक कडून करून घेता येतील, पाटोदा तालुक्याचे गटविकास अधिकारी उध्दव सानप यांनी सर्व ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांना त्वरित लेखी आदेश काढला. सर्वांनी आपापल्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याचे आदेश दिल्याने सर्व ग्रामसेवक आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहू लागल्याने पाटोदा तालुक्यातील अनेक गावातील गावकऱ्यांनी समाधान व्यक्त आहे.
What's Your Reaction?






