पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात, सख्ख्या भावांपैकी एक ठार तर एक गंभीर

बीड प्रतिनिधी: गेवराई तालुक्यातील उमापुर शेवगाव रोडवर पिकप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे, यामध्ये दोन संख्या भावांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर एक गंभीरित्या जखमी झाला आहे. त्याला छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी तात्काळ हलवण्यात आले आहे. सदर घटनेने परिसरात मोठी हळहळ केली जात आहे.
गेवराई तालुक्यातील उमापुर ते शेवगाव रस्त्यावर गेवराई येथून सांगोळे बंधू हे दुचाकी क्रमांक एम एच 23 व्ही एच 77 32 वरून उमापूर कडे जात होते. मात्र यावेळी गेवराई तालुक्यातील तळणेवाडी आणि माऊली संस्थान बोरी पिंपळगाव फाट्याजवळ आले असता, शेवगाव कडून अंबड कडे जाणारी मासे वाहतूक करणारा पिकप क्रमांक एम एच 21 बी एच 57 37 यांचा भीषण अपघात झाला. सदर अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये उमापूर येथील रहिवासी दादासाहेब सांगोळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे बंधू उमेश सांगोळे हे गंभीरित्या जखमी झाले. त्यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. तसेच दादासाहेब यांचा मृतदेह उमापूर येथील रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. यावेळी माहिती मिळताच घटनास्थळी गेवराई ठाण्याचे दत्तू उबाळे शेखर हिंगावर यांनी घटनास्थळी धाव घेऊन, सदर घटनेचा पंचनामा केला. सदर घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?






