पोलीस पाटील रिक्त पदे भरा प्रा. ईश्वर मुंडे

बीड (प्रतिनिधी) पोलीस पाटील हे गाव गाडयातील मान सन्मानाचे तसेच शांतता- सुव्यवस्था टिकवून ठेवत पोलीस प्रशासन व जनता या मध्ये समन्वय ठेवणारे महत्वाचे पद आहे.
महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातील बहुतांशी पोलीस पाटील यांची पदे विविध कारणांनी रिक्त झालेली आहेत. सदरील पदे अनेक वर्षा पासून रिक्तच आहेत.या मुळे गावगाडयात एक पोकळी निर्माण झालेली आहे.
तरी बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील यांची रिक्त पदे भरणेबाबतची कार्यवाही तात्काळ करून ही पदे लवकरात लवकर भरावीत असे लेखी निवेदन प्रा.ईश्वर आनंदराव मुंडे,राज्य प्रमुख, सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी विभाग, राष्ट्रवादी कॅांग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी मा.अविनाश पाठक,जिल्हाधिकारी,बीड यांना दिले आहे.
सदरील मागणीच्या निवेदनास सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस पाटील यांची रिक्त पदे भरण्याबाबत जलद गतीने कार्यवाही करून ही पदे लवकरात लवकर भरू असे अश्वासन मा.अविनाश पाठक जिल्हाधिकारी,बीड यांनी दिले असल्याचे प्रा.ईश्वर मुंडे यांनी प्रसिध्दी माध्यमांना सांगितले आहे.
या वेळी सोबत श्रीराम मुंडे, प्रदेश प्रवक्ते,राष्ट्रवादी कॅांग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भटके विमुक्त विभाग हे होते.
What's Your Reaction?






