गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस विकणाऱ्या टोळीवर पोलिसांची कारवाई
बीड प्रतिनिधि :- सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत सोहब, उपविभाग केज यांची पोलीस स्टेशन केज हद्दीमध्ये अवैध व बेकायदेशिर रित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुस विक्री करणारी संघटीत गुन्हेगारी टोळीस ताब्यात घेवुन एकुण पाच आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत सोहब, उपविभाग केज यांचा गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मध्यप्रदेश राज्यातुन अक्षय आटवले. व त्याचे साथिदार हे त्यांचे स्वतःचे अर्थिक फायद्यासाठी व दहशत करण्यासाठी विनापरवाना बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचे गावठी कट्टे काडतुसासह बीड जिल्हयात व महाराष्ट्रात त्याची चोरटी विक्री करत असुन व ते देशी बनावटीचे कट्टे बीड जिल्हयात विक्रीसाठी गाडीतुन घेवुन येत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत नेकनुर ते केज रोडवर बरडफाट्याजवळ सदर गाडीचा पाठलाग करुन त्यातील इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांच्या ताब्यात एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, पाच जिवंत काडतुस, सहा मोबाईल व एक स्विफ्ट गाडी मिळुन आल्याने जप्त करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे अक्षय शामराव आठवले, संजेश सुरेश पाटेकर, वैभव मुकुंदराव कपाळे, ओंकार अरुणराव पवार सर्व रा. बीड असे असुन देशी बनावटीचा कट्टा पुरवनारा इसम हा फरार आहे. सदर कारवाई मध्ये एकुण 5 आरोपी विरुध्द पोना/दिलीप गित्ते यांचे फिर्यादी वरुन केज पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन फरार आरोपीचा शोध घेणे चालु आहे. सदर गुन्हयातील आरोपीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनीयम प्रमाणे कारवाई करण्याची शक्यता आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत सोहब, उपविभाग केज यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, बालासाहेब डापकर, दिलीप गित्ते, अनिल मंदे, भरत शेळके, होमगार्ड सारुक व आंधळे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पंकज कुमावत सोहब व पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस कर्मचारी संतोष गित्ते, महादेव बहिरवाळ हे करीत आहेत.
What's Your Reaction?