गुटख्याच्या साठ्यावर पोलिसांची धाड

बीड तालुक्यातील खोडकराजुरी शिवारामध्ये अवैध साठा करून ठेवलेल्या गुटख्यावर ,आष्टीचे पोलीस उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांनी धाड टाकून कारवाई केली आहे .याप्रकरणी संबंधित साठा जप्त करून, बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बीड तालुक्यात ,घोडका राजुरी या गावाच्या शिवारामध्ये, अशोक धोंडीराम डरपे यांच्या शेडमध्ये अवैध, विनापरवाना महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला, गुटखा आढळून आला. सदरील गुटखा 02 लाख 03 हजार 534 रुपयांचा होता. याची पोलिसांनी विचारपूस केली असता, सदर गुटखा हा बीड तालुक्यातील मैदा येथील बाळासाहेब घुमरे यांच्याकडून घेतले असल्याचे सांगितले.याप्रकरणी दोघांवर अन्न व औषध अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या फिर्यादीवरून, पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात डरपे यास अटक केले असून घुमरे फरार असल्याचे सांगण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांच्या यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.
What's Your Reaction?






