शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत मटक्यावर पोलिसांची धाड

बीड प्रतिनिधी:- शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मटक्यावर धाड टाकली असून, मालकांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 01 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये अवैध धंदे सध्या डोके वर काढू लागले आहेत. शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मटका सुरू असल्याची माहिती, पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. यानंतर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख गणेश मुंडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन मटक्यावर धाड टाकली. तेव्हा त्यांना सागर चांगदेव भोसले.गोविंदनगर, मोमीन माजेद मोमीन खाजा. राजुनगर, दादासाहेब रामभाऊ माने. केतुरा, आसरार मोहमद खान दोस्त मोहमद खान. राजुनगर धानोरा सुलतान खान सादात खान. खाजीनगर बालेपीर, यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख 18 हजार 100 रुपये, एक दुचाकी, आठ मोबाईल असा 1 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघां सह बुकीमालक नितीन खोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकाने केली.
What's Your Reaction?






