इमामपूर येथे अवैध दारूवर पोलिसांची धाड, विक्रेते फरार

इमामपूर येथे अवैध दारूवर पोलिसांची धाड, विक्रेते फरार

 बीड (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क, बीड व स्थानिक गुन्हा शाखा बीड यांच्या संयुक्त पथकाने इमामपूर ता जि बीड येथे अवैध दारू विक्री विरुद्ध कारवाई केली असून देशी विदेशी दारूच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या असून सदर आरोपी महादेव मुकिंद कदम रा इमामपूर ता. जि. बीड व आरोपी बाळासाहेब उत्तम चव्हाण रा. इमामपूर ता. जि. बीड हे मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.

इमामपूर गावच्या हद्दीत असलेले निनावी शेडमध्ये व गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या किराणा दुकानात ता जि बीड येथे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, बीड व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला असता पत्र्याचे शेडमध्ये देशी दारू बॉबी संत्राच्या 180 मिली क्षमतेच्या 95 बाटल्या, मॅक्डॉल नं.1 व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या, मॅक्डॉल नं. 1 रमच्या 180 मिली क्षमतेच्या 15 बाटल्या असा एकूण 12775/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचप्रमाणे किराणा दुकानामध्ये देशी दारू बॉबी संत्राच्या 180 मिली क्षमतेच्या 38 बाटल्या, मॅक्डॉल नं.1 व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 24 बाटल्या, इम्पेरिअल ब्ल्यू व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 09 बाटल्या असा एकूण 7700/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर दोन्ही गुन्ह्यातील आरोपी महादेव मुकिंद कदम रा इमामपूर ता. जि. बीड व आरोपी बाळासाहेब उत्तम चव्हाण रा. इमामपूर ता. जि. बीड हे फरार असून त्याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्यांचा तपास सुरु आहे.

सदर कारवाई मध्ये श्री अभय औटे प्र. निरीक्षक, श्री आर बी राठोड निरीक्षक, श्री व्ही डी आगळे, श्री अरुण खाडे, श्री अनंता नायबळ, उप निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, श्री संजय तुपे उप निरीक्षक स्था.गु. शाखा. बीड व जवान सर्वश्री बी. के. पाटील, एस.व्ही.धस, आर.एम. गोणारे, एन बी मोरे, एस.एस.ढोले, पी.पी. मस्के, तुळशीराम जगताप, कैलास ठोंबरे व इतर यांनी उपरोक्त कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री अभय अ औटे व श्री आर बी राठोड निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, बीड हे करीत आहेत

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow