प्रज्वल गलगटे अबॅकस मध्ये विजेता ठरला

प्रज्वल गलगटे  अबॅकस मध्ये विजेता ठरला

प्रज्वल गलगटेने अबॅकसमध्ये सर्वोत्कृष्ट मार्क्स मिळवून सर्वोत्कृष्ट प्रथम येण्याचे मानांकन मिळवले आहे.

शहरातील अबॅकस तथा वैदिक मॅथ आणि रुबिक क्यूब प्रशिक्षण केंद्राद्वारे अनेक विद्यार्थ्यांना बौद्धिक दृष्ट्या स्वावलंबी करण्याचे उत्कृष्ट शैक्षणिक कार्य गेल्या काही वर्षापासून सतत अविरत चालू आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास करण्याच्या उद्देशाने गणितीय पद्धतीचा तंत्राच्या द्वारे, वैदिक मॅथच्या द्वारे, अबॅकस द्वारे विद्यार्थ्यांमधील गणिता विषयाची भीती दूर करण्याचे कार्य डॉ. श्री. घोडके ए एस मास्टर अबॅकस तथा वैदिक मॅथ ट्रेनर यांच्याद्वारे केले जात आहे. मास्टर अबॅकस हुशार विद्यार्थि प्रज्वल प्रभाकर गलगटेला अबॅकस जूनियर पहिल्या लेवल्समध्ये प्रथम क्रमांक मिळवून यशस्वीरित्या वुडन सायटेशन आणि पदक मिळवले असून अनेक राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा भाग घेण्याची संधी मिळवले आहे . अद्वैतला दिनांक 10 जून 2023 रोजी अबॅकस प्रथम क्रमांकाचे कम्प्लिशन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे . अबॅकस तथा वैदिक मॅथआणि रुबिक क्यूब प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रज्वल प्रभाकर गलगटेने अबॅकस प्रथम क्रमांकामुळे दिल्ली येथील अबॅकस असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधरन एस बी, उडीसा राज्याचे अबॅकस मास्टर ट्रेनर तथा एमडी ऍरिस्टो किड्स श्री उज्वल पांडा, महाराष्ट्र राज्य स्तरावरील विदर्भ अबॅकस प्रमुख श्री अमोल विरवले, तेलंगणा तथा आंध्र प्रदेशच्या प्रमुख आय सी एम एसच्या एमडी श्रीमती वरलक्ष्मी तसेच एम एम गो यु एस ए अमेरिकाचे प्रमुख जॉर्ज स्टीफनहार्ट तथा अबॅकस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख श्री डॉ. ए एस घोडके यांनी प्रज्वल प्रभाकर गलगटेचे अभिनंदन करून उज्वल भविष्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत.प्रज्वल प्रभाकर गलगटे म्हणतो की माझ्या अबॅकसच्या अभ्यासामुळे व्यक्तिमत्व विकास होतच असून होकारात्मक दृष्टिकोन तसेच गणिताबद्दलची भीती कमी होत आहे आणि सहज सोप्या पद्धतीने अनेक क्लिष्ट गणित सुद्धा मी सहजरित्या सोडवत आहेत"

अशाच अनेक विद्यार्थ्यांमध्ये गणिताबद्दलची भीती कमी करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे कार्य अबॅकस स्टडी केंद्राद्वारे सतत केले जात आहे येणाऱ्या काही वर्षांमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी यश मिळवतील हे नक्कीच आहे असे जिल्हा अबॅकस वितरक श्री डॉ. घोडके ए एस यांनी सांगितले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow