प्रवीण पाटील यांचा सूत गिरणी कामगारांकडून सन्मान

प्रवीण पाटील यांचा सूत गिरणी कामगारांकडून सन्मान

शहादा प्रतिनिधी: सुतगिरणीत रिंग फ्रेम विभागात जाबर पदावर कार्यरत असलेले प्रविण राजधर पाटील हे आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी वयाच्या ५८ वर्षी सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्तीने सुतगिरणी कामगार युनियन तर्फे शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सुतगिरणीतील रतिलाल पावरा व त्यांच्या सहकारी मित्रांकडून प्रभू श्रीरामाची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सुतगिरणीतील कामगारांनी सुद्धा गुलाब पुष्प देऊन प्रविण पाटील यांचा सत्कार केला.

                मी १९८५ साली सुतगिरणीत कामाला लागलो.सुतगिरणीत कामगार मित्रांनी मला चांगली साथ दिली म्हणून मी एवढी वर्षे सेवा करू शिकलो.आजही कामगार मित्र माझ्यासोबत आहेत, याचा मला आनंद आहे.मी त्यांचा ॠणी आहे.त्यांनी माझा सत्कार केला, माझा सन्मान केला.मी आज भारावून गेलो आहे अशी प्रतिक्रिया सेवानिवृत्त जाबर प्रविण पाटील यांनी दिली.

               प्रविण पाटील हे आमच्याशी प्रेमाने वागत.ते आमच्याशी मित्रत्वाच्या नात्याने राहिले.त्यांचा स्वभाव प्रेमळ आहे.ते आम्हाला नेहमी सहकार्य करायचे.आम्हाला त्यांची कायम आठवण राहील,सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा! अशा भावना व्यक्त करीत कामगार मित्रांनी प्रविण पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow