प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा भारत अमेरिका संबंधांना पवित्र करणारा ठरेल असं भारत प्रशांत क्षेत्राचे उच्च पदस्थ कर्ट कँम्पबेल यांचं मत
मोदी यांचा आगामी अमेरिका दौरा भारत आणि अमेरिकेच्या संबंधांना आणखी पवित्र करेल, असं भारत - प्रशांत क्षेत्रासाठीचे जो बायडेन सरकारचे उच्च पदस्थ, कर्ट कँम्पबेल यांनी म्हटलं आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातला विश्वास आणि दृढ संबंध सध्याचे नसून दशकापुर्वीचे असल्याचंही ते म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याबद्दल ते म्हणाले की, जागतिक पटलाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या भेटीमुळे गुंतवणूक आणि लोकांच्या एकमेकांबरोबरच्या संबंध वाढीला चालना मिळेल, असंही कँपबेल म्हणाले. भारत- अमेरिका तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भागीदारीवर ते म्हणाले की, आमच्या विद्यपाीठांनी अभियंते आणि तत्रज्ञांना आणखी प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
जागतिक पटलावर भारताच्या गंभीर भूमीकेचं सगळ्या जगानं कौतूक केलं असल्यावर त्यांनी भर दिला. अमेरिकेच्या दोन्ही सभागृहाला संबोधीत करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले प्रधानमंत्री आहेत.
What's Your Reaction?