परीक्षांच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू

परीक्षांच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू

बीड प्रतिनिधी: तुळजा भवानी मंदिर संस्थान, तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे सरळ सेवेने वर्ग 3 व वर्ग 4 मधील विविध पदे भरण्यासाठी आयबीचीएफ (IBPS) कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने खालील प्रमाणे नमूद केलेल्या परिक्षा केंद्रावर दि. 13 जुलै 2024 व दि. 14 जुलै 2024 रोजी तीन सत्रात परीक्षा होणार आहेत. परीक्षे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

            प्रोफेशनल करिअर ओरिएंटेशन सेंटर अंबाजोगाई, योगेश्वरी महाविद्यालय कॅम्पस, परळी रोड, अंबाजोगाई, परीक्षा केंद्राजवळच्या 100 मीटरच्या पररीसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी बुथ, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके परिक्षेच्या कालावधीत बुथ ठेवणे आवश्यक असल्याने परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

       परीक्षा केंद्राच्या 100 मिटर परिसरात दि. 13 व 14 जुलै 2024 रोजी त्या त्या दिवशीच्या परिक्षेच्या वेळीच्या कालावधीत आणि परिक्षा साहित्य ठेवलेल्या ठिकाणी फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 (2) प्रमाणे परीक्षा केंद्र व परिसरात खालीलप्रमाणे कृत्य करण्यास मनाई आदेश जारी केले आहे.

     हे आदेश परीक्षेच्या कामाकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाही. परीक्षा केंद्राबाहेर व परिसरात परिक्षेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी व परिक्षार्थी यांना वगळून दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

       परीक्षा केंद्राजवळच्या 100 मीटरच्या परीसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन,एसटीडी बुथ फॅक्स, झेराक्स केंद्र व ध्वनीक्षेपके परिक्षेच्या कालावधीत चालू ठेवण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. शासकीय व परिक्षेसंबधीत कर्मचा-यांच्या व विद्यार्थ्यांच्या वाहना व्यतिरिक्त इतर अनाधिकृत वाहनांना परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

   हे आदेश कोणत्याही धार्मिक कार्यक्रम, मयाताची अंत्ययात्रासाठी लागू राहणार नाहीत. हे आदेश वरील परीक्षा केंद्रावर दि. 13 व 14 जुलै 2024 या कालावधीत त्या त्या दिवशीच्या परिक्षेच्या वेळेच्या एक तास अगोदर ते परिक्षा पेपर संपेपर्यंतच्या कालावधीसाठी तसेच साहित्य ठेवलेल्या ठिकाणी व परीक्षा केंद्राच्या आवारात लागू राहतील. असे अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow