उपोषणकर्त्यांच्या निवाऱ्याची सोय करा! डॉ संजय तांदळे
बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते , शेतकरी, मजूर ऊसतोड कामगार ,नागरिक आदींचे शासन दरबारी आपापल्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यालगत असलेल्या ओट्यावर सातत्याने विविध प्रकारचे आंदोलने व उपोषणे चालू असतात.या उपोषण स्थळी बाजूने नाली वाहत असून ती नेहमीच तुंबलेली असते व तिचा दुर्गंध सातत्याने येत असतो.तसेच महिला व पुरुषांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही तसेच स्वच्छतागृह व मुतारीची सोय नाही व निवारा देखील नाही.उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्हीही ऋतूमध्ये उपोषणकर्त्यांना त्रास होत असून उन्हाळ्यात व पावसाळ्यात उपोषणकर्त्यांना अधिकचा त्रास होत असून विशेष करून उन्हाळ्यात उपोषणकर्त्यांना उन्हाचा त्रास होऊन अनेकांना दवाखान्यात उपचार घेण्याची वेळ आलेली आहे .उन्हापासून काही प्रमाणात संरक्षण देणार एक मोठ झाड देखील दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने तोडलेले आहे.दीर्घकालीन उपोषणास बसलेल्या एका महिलेची डिलिव्हरी उपोषण स्थळी झाली असून बाळाचा मृत्यू देखील झालेला आहे. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियाना अंतर्गत शासन आपल्या दारी उपक्रम जिल्ह्यातील परळी येथे दिनांक 20 ते 25 सप्टेंबर 2023 दरम्यान होणार असल्याचे समजते उपोषण स्थळी निवारा बांधण्यासाठी बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या वतीने गेली दहा वर्षापासून लोकशाही मार्गाने प्रशासनाकडे मागणी करीत आहोत.सामान्य उपोषणकर्त्याकडे उपोषण स्थळी कापडाचा मंडप टाकण्याची देखील ऐपत नसते, साधारण एका उपोषण कर्त्याला आपण एक दिवसाचे एक हजार रुपये कापडी मंडपाचे भाडे सरासरी धरले तर वर्षाला तीन लाख 65 हजार रुपयांचा बोजा उपोषणकर्त्यावर पडत आहे.सामान्य कार्यकर्त्यांनी मंडप भाड्यासाठी पैसा आणायचा कुठून हा प्रश्न उपस्थित राहतो.दोन वर्षांपूर्वी बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ संजय तांदळे कार्याध्यक्ष एस एम युसुफ यांनी तात्कालीन जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांना उपोषण स्थळी निवाऱ्याची सोय करण्याबाबत निवेदन दिले होते पत्र्याच्या शेड चा निवारा बांधून देण्यास रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश बंब यांनी संमती दिली होती.तशा आशयाची समिती पत्र देखील तत्कालीन जिल्हाधिकारी यांना दिले होते .परंतु त्यांनी कोणतेही कारणाचे स्पष्टीकरण न देता , निवारा बांधण्यासाठी परवानगी दिली नाही तरी आपण पत्र्याच्या शेडचा निवारा बांधण्यासाठी रोटरी क्लब ला परवानगी देण्यात यावी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आपण निवाऱ्याची सोय करावी तसेच शासन आपल्या दारी उपक्रम अंतर्गत 75 हजार लाभार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जनकल्याण कक्ष कायमस्वरूपी सुरू करून तक्रारदारांची आठ दिवसात एक बैठक घेऊन याद्वारे लाभार्थ्यांना न्याय देण्यात यावा, बीड जिल्हा मध्यवर्ती ठिकाण असून लाभार्थ्यांना सोयीचा असून शासन आपल्या दारी कार्यक्रम बीड येथे घेण्यात यावा आदि मागण्या बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ संजय तांदळे कार्याध्यक्ष एस एम युसुफ सचिव सुदाम कोळेकर यांनी दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ,कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे .
What's Your Reaction?