मणिपूर घटनेचा लोकसेना संघटनेकडून जाहीर निषेध

मणिपूर घटनेचा लोकसेना संघटनेकडून जाहीर निषेध
इनामदार

बीड प्रतिनिधि: देशात घडणाऱ्या मोब्लिचिंग घटनांना केंद्र सरकारने वेळीच गंभीरतेने घेतले असते, बिलकिसबानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपिंना सूट दिली नसती तर आज भारतात अनेक ठिकाणी मोबगैंगरेपच्या घटना घड़ल्या नस्त्या, भारतातीलच एक उत्तर पूर्व राज्य आसाम नंतर मणिपुर अनेक महिन्यापासून जळत आहे मानवतेला काळीमा फासण्याच्या घटना मणिपुर मध्ये घडत आहे महिलांवर सामूहिक बलात्कार करुन गांव गांव फिरविण्यात येत आहे त्यांना जीवंत जाळण्यात येत आहे सरेआम कत्तली होत आहे राष्ट्रीय संपत्ती, नागरिकांच्या जीवितेचे, संपत्तीचे नुकसान होत आहे आरोपी सरेआम हत्यारे घेवून सार्वजनिक ठिकाणी फिरत आहे त्यांच्यावर मणिपुर सरकार कोणतीही कार्यवाही करत नाही, व केंद्र सरकारचा ही मणिपुर सरकारवर कसलाही अंकुश दिसत नाही. म्हणून लोकसेना संघटना या घटनेचा जाहिर निषेध करत असून लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी निवेदनाद्वारे देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना मागणी केली की मणिपुर सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा व दंगेखोर व मागासवर्गीय हिंदू महिलांना विवस्त्र करुन बेआबरू करणाऱ्या हरामखोरांना फाशीची शिक्षा दया अशी मागणी लोकसेना संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

                                       

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow