होणाऱ्या मोठ्या नुकसानापासून वाचा......

होणाऱ्या मोठ्या नुकसानापासून वाचा......

     आपल्यापैकी प्रत्येकालाच आजचे काम उद्यावर टाकायची खोड आहे.

मी स्वतःचा अनुभव घेतला आहे आणि त्यामुळे माझ्यावर पश्चातापाची पाळी आली आह. 

        मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे, आणि त्यामुळे माझ्यावर पश्चातापाची पाळी आली आहे , काम उद्यावर टाळण्याच्या सवयीमुळे नकारात्मकता वाढीस लागते , काम करून होणाऱ्या श्रमामुळे जेवढा थकवा येतो , त्यापेक्षा जास्त काम टाळण्याच्या सवयीमुळे होतो. कुठलेही काम पूर्ण झाल्यामुळे आनंद आणि उत्साहाचा अनुभव येतो पण काम अर्धवट टाकून दिलेल्या कामामुळे एखादे भागधड पडलेल्या गळकी टाकी हळू-हळू रिकामी व्हावी तशी सारी ऊर्जा निघून जाते. तुम्हाला सकारात्मकता निर्माण करून ती वाढवण्याचे असेल तर तुम्ही "वर्तमानत जगायचे" आणि प्रत्येक गोष्ट "आज नव्हे" तर 'आत्ताच' करण्याची सवय लावून घेतली पाहिजे.

चंद्राच्या शितल छायेत त्यांनी निद्रा घेतली

 आणि सूर्य स्नानांचा आनंदही लुटला . 

हे करीन ,ते करीन मानत आयुष्य जगला ,आणि 

 एके दिवशी काही न करता त्याचा ग्रंथ आटोपला.

मी मोठा झाल्यावर .......... 

मी मोठा झाल्यावर हे करीन ते करीन आणि सुख प्राप्त करी असं म्हणणारा छोटा मुलगा सर्वांनी पाहिला असेल . आणि तोच मुलगा मोठा झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर सुखासाठी हे करीन ते करीन , असा निश्चय तो पुन्हा करतो शिक्षण संपल्यावर हेच सुख नोकरीमुळे प्राप्त होईल अशी त्याचे समजूत असते.

        नोकरी मिळाल्यानंतर सुखाच्या शोधात तो लग्नही करतो. पण त्याला सुख मिळत नाही असे हाव व भाबडी आशा करत तो पूर्ण आयुष्य घालवतो . पण सुख मिळत नाही पण हे सुख शोधत तो गुंतून गेलेला असल्याकारणाने त्याला असे समजत नाही की  आपण आपले खरे आयुष्य जगलोच नाही , तो लहान मुलगा वृद्ध अवस्थेत असताना मग असा विचार करतो की.

  • मी असे केले असते तर तसं घडू शकलं असतं . 
  • मी असा करायला हवा होतो.
  • मी ते करू शकलो असतो.
  • मी ते केलं असतं तर बरं झालं असतं.

मी थोडा अधिक प्रयत्न केला असता तर किती छान झालं असत. 

 त्यामुळे सकारात्मक मानसिकतेसाठी चाल ढाल करणाऱ्या सवयीचा त्याग करा व त्वरित कृती हा मंत्र लक्षात ठेवा . 

चे काम तुम्ही आज करू शकता ते तुम्ही उद्यावर टाळण्याची सवय मोडा.

सर्व बातमी आत्ता एकाच क्लिक वर Download अँप 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow