घरातील वाईट शक्ती काढतो म्हणाला; 16 तोळे दागिन्याला गंडा घालून फरार झाला

तुमच्या घरातील वाईट शक्ती काढून टाकतो! असे म्हणत तब्बल 14 तोळे दागिन्यास गंडा घालून ,दोघेजण फरार झाल्याची घटना, बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये घडली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुमच्या घरामध्ये वाईट शक्तीने प्रवेश केला आहे. त्यामुळे तुम्ही आजारी असतात .त्यामुळे ही तुमच्या घरातील वाईट शक्ती बाहेर काढावी लागेल .यासाठी सुवर्ण कलश पूजा करावी लागेल .असे म्हणत सदर कुटुंबीयास विश्वासात घेतले .आणि घरामध्ये कलश तयार करून त्यामध्ये सर्व दागिने कलश मध्ये टाकले. एकूण 14 तोळे सोने कलरश मध्ये टाकून झाकून ठेवले व त्यानंतर सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले. आणि कळस मधील दागिने काढून त्यामध्ये कोळसा टाकला. आणि पुन्हा घट्ट बांधून ठेवला व सर्वांना आत पुन्हा बोलावून घेतले आणि म्हणाले, हा कळस बारा वर्षे खोलायचा नाही! जर तुम्ही खोलला तर मोठा अनर्थ होईल !आणि वाईट शक्ती बाहेर जाणार नाही! असे म्हणत निघून गेले.मात्र संबंधित कुटुंबीयांना संशयाने त्यांनी पुन्हा त्या कळसाला उघडून पाहिले तर आत मध्ये दागिने न दिसता कोळसा दिसला. त्यानंतर आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर ,त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले.आणि फिर्यादी संजीवनी मेडकर यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र लोटके आणि मीना लोटके जिल्हा अहमदनगर या दोघांच्या विरोधात शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
What's Your Reaction?






