महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर दरोडा
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर चोरट्यांनी रात्रीच्या दरम्यान पाठीमागून खिडकी तोडून आत मध्ये प्रवेश करत दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली असून, घटनास्थळी नेकनूर पोलीस दाखल झाले आहेत.
आज दि.११ जुन रविवार रोजी मध्यरात्री लिंबागणेश ता.जि.बीड येथील मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील लिंबागणेश बसस्थानक स्थित बँकेत धाडसी चोरी झाल्याचा प्रकार आढळून आला आहे.नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनि शेख मुस्तफा, उपनिरीक्षक विलास जाधव, शेख लिंबागणेश पोलिस स्टेशनचे पो.ह.सचिन डिडुळ,नवनाथ मुंडे घटनास्थळी दाखल झाले असुन वरीष्ठांना कल्पना दिली असुन श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण केले आहे.
मध्यरात्री लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पाठीमागील बाजुने लोखंडी शिडीवरून चढून गस कटरच्या सहाय्याने लोखंडी खिडकीचे गज तोंडुन आत प्रवेश केला व स्ट्रागरूम कटरने फोडुन बँक मनेजर प्रणव कापसे यांच्या म्हणण्यानुसार अंदाजे साडे बारा लाख रोख रक्कम व काही सोने चोरीला गेले आहे.नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनि शेख मुस्तफा व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाले असुन स्थानिक गुन्हे शाखा,ठसेतज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले आहे.
Files
What's Your Reaction?