बोगस पिक विमा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन
बीड प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यात परराज्यातील भामट्यांनी बीड शहरातील एमआयडीसी तसेच बीड नगरपालिकेची जागा शेतजमीन दाखवून अतिरिक्त बोगस पिकविमा भरून बीड जिल्ह्या बदनामीचे षडयंत्र रचत प्रामाणिक विमा भरणा-या शेतकऱ्यांचे नुकसान करून शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक करणा-या बोगस पिक विमा रॅकेट चालवणा-या संबंधित गुन्हेगारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच बीड जिल्ह्यात दृष्काळ सदृश्य परिस्थिती असुन खरीप हंगामी पैसेवारी ४८.०७ जाहीर झालेली असल्याने बीड जिल्ह्यातील ८६ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीक विमा देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.०२.१०.२०२३ महात्मा गांधी जयंती दिनी सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड, जिल्हा कृषी अधीक्षक बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, कृषीमंत्री यांना निवेदन देण्यात आले.आंदोलनात शेख युनुस,शेख मुस्ताक, शेलार शिवशर्मा, प्रदिप औसरमल सहभागी होते.
बीड नगरपालिकेची जागा शेत जमीन दाखवुन
पीक विमा घोटाळा प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा
-तेलंगणा राज्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर, नागपूर व पुणे जिल्ह्यातील व्यक्तींनी बीड नगरपालिकेची जागा शेत दाखवुन तब्बल १६ हजार २२९ एकरचा पिकविमा उतरवल्याचा गंभीर प्रकार समोर आला असुन संबंधित प्रकरणी शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक तसेच बीड जिल्हा बदनामीचे षडयंत्र म्हणून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
बीड एमआयडीसीच्या ४६७ एकरवर शेत दाखवुन पीक विमा घोटाळा प्रकरणी फौजदारी कारवाई करा
बीड शहरातील एमआयडीसीचा परीसर शेत दाखवुन १८०
जणांनी तब्बल ४६७
एकरचा पीक विमा उतरवला असुन आष्टी तालुक्यातील कडा येथील वैद्यकीय व्यावसायिक आणि त्यांच्या भावाने ९८८ एकरचा पीक विमा उतरवला असुन त्यांना केवळ ११ एकर जमीन आहे.त्यामुळे संबंधित प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती असुन ८६ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट २५ टक्के अग्रीम पीक विमा द्यावा
बीड जिल्ह्यात दृष्काळ सदृश्य परिस्थिती असुन जिल्ह्याची खरीप हंगामी पैसेवारी ४८.०७ जाहीर झालेली आहे.
बीड जिल्ह्यात ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात पावसाने मोठी ओढ दिली .अनेक मंडळामध्ये २१ ते ३० दिवसांचा पावसाचा खंड पडला त्यामुळे साडेसात लाख हेक्टर वरील सोयाबीन, कपाशी, उडीद,मुग, बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांतून २५% पीक विमा अग्रीम मंजुरीची मागणी केल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच ८६ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २५% पीक विमा अग्रीम मंजूर केला असुन जिल्हा स्तरीय समितीच्या शिफारशी नुसार समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तशा अधिसूचना निर्गमित केल्या. मात्र आता कंपनीने या अधिसूचना मान्य नसल्याचे सांगून केवळ १४ महसूल मंडळामध्येच पावसाचा खंड असल्याचे सांगत एवढ्याच महसूल मंडळांना विमा अग्रीम देण्यास राजी असल्याचे विभागीय आयुक्तांकडे केलेल्या अपिलात म्हटले आहे.मात्र दृष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या बीड जिल्ह्यातील ईतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांवर अन्याय असुन सरसकट ८६ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीक विमा तातडीने देण्यात यावा.
What's Your Reaction?