सौताडा सज्जाचा तलाठी 20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडला
बीड प्रतिनिधी :- सौताडा येथील सज्जाचा तलाठी 20 हजार रुपयाची लाज घेताना वांजरा फाटा येथे रंगेहात पकडला. सदर कारवाई आज गुरुवारी बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सौताडा सज्जाच्या हद्दीमध्ये, तक्रारदार यांच्या मुलीच्या नावे सौताडा शिवारात असलेली, जमीन दिवाणी न्यायालय पाटोदा येथे प्रकरणात तोडजोड झाल्यानंतर, न्यायालयाने तक्रारदार यांच्या सुनेच्या नावावर ,सदर जमीन करण्यात आदेशित केले. याच आदेशाच्या अंमलबजावणीसाठी, सौताडा सज्जाचे तलाठी प्रवीण संदिपान शिंदे यांच्याकडे, न्यायालयीन आदेश प्रति सह अर्ज दाखल केला. त्यानंतर तलाठी शिंदे यांनी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली यामध्ये मुद्रांक शुल्क न भरता काम करून देण्याची हमी दिली .हीच ठरलेली लाच स्वीकारताना तलाठी प्रवीण शिंदे याला पाटोदा तालुक्यातील वांजरा फाट्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगीहात पकडले. याप्रकरणी तलाठी प्रवीण संदिपान शिंदे यांच्यासह अन्य एका खाजगी इसमावर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी सांगळे, गोरे ,राठोड ,मेहेत्रे आदींनी केली आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत
What's Your Reaction?