नातलगांची शोधाशोध, कुणी फोटो पाहतंय, तर कुणी मृतदेह
चार दिवसांपूर्वी ओडिशात भीषण रेल्वे अपघात घडला. या अपघाताने अनेक घरं उध्वस्त झाली. कुणी मुलाला गमावलं, तर कुठे अख्खं कुटुंब संपलं. मात्र, अजूनही मृतांपैकी अनेकांची ओळख पटलेली नाही. या अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १००० हून जास्त जण जखमी झाले आहेत.
1 / 4
1. फोटोंमध्ये नातलगांचा शोध सुरु
ओडिशा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी आतापर्यंत केवळ ८८ जणांची ओळख पटली आहे. मृतदेहांची ओळख पटवणे हे देखील मोठे आव्हान आहे. शवागारात अशा मृतदेहांचा ढीग आहे, ज्यांची अद्याप ओळख पटलेली नाही किंवा त्यांच्यावर दावा करायला कुणीही आलेलं नाही. ही संख्या इतकी जास्त आहे की शवागारातील जागा संपली आहे.
What's Your Reaction?